शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील डान्सबार प्रकरणी दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर निलंबनाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 21:50 IST

पोलीस आयुक्त जयजित सिंह यांनी नौपाडा आणि वर्तकनगर येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे. तर नौपाडा आणि वर्तकनगर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांना आता ठाणे शहर नियंत्रण कक्षामध्ये बदली केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देदोन सहाय्यक पोलीस आयुक्तांची बदली तीन बारचा परवानाही निलंबित गृहमंत्र्यांच्या आदेशाने पोलीस आयुक्त जयजित सिंग यांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: एकीकडे कोरोनाचे निर्बंध लागू असतांनाच ठाणे शहरातील भर वस्तीमध्ये मात्र खुल्लमखुल्ला डान्स बार सुरु असल्याची माहिती हाती येताच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आदेशानंतर पोलीस आयुक्त जयजित सिंह यांनी नौपाडा आणि वर्तकनगर येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे. तर नौपाडा आणि वर्तकनगर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांना आता ठाणे शहर नियंत्रण कक्षामध्ये बदली केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या संपूर्ण प्रकरणाची अतिरिक्त पोलीस आयुक्ताच्या ंमार्फतीने चौकशीचे आदेशही दिले आहेत.ठाणे शहरातील नौपाडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील आम्रपाली आणि अँटीक पॅलेस या दोन बारसह वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील नटराज हे तीन डान्सबार सर्रासपणे सुरु असल्याची माहिती उजेडात आली. शिवाय, या डान्सबारमध्ये कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवित खुलेआमपणे बारबालांचा डान्सही सुरु होता. ही माहिती समोर येताच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी तातडीने पोलीस महासंचालकांना चौकशीचे आदेश दिले. याचीच दखल घेत ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंह यांनी प्रथमदर्शनी संक्षिप्त चौकशीच्या आधारे नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले आणि वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना सोमवारी सायंकाळी निलंबित केले. तर नौपाडा विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी आणि वर्तकनगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ यांचीही कर्तव्यात कसूरी केल्याने ठाणे शहर नियंत्रण कक्षामध्ये बदली केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, ठाणे शहरातील आम्रपाली, अँटीक पॅलेस आणि नटराज या तीन बारचा परवानाही निलंबित केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

‘‘ प्राथमिक चौकशीत नौपाडा आणि वर्तकनगर येथील तीन बार सुरु असल्याचे आढळल्यामुळे दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर निलंबनाची तर दोन सहायक आयुक्तांना नियंत्रण कक्षात बदली केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरुन चौकशी करण्यात येत आहे.’’जयजित सिंह, पोलीस आयुक्त, ठाणे शहर

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी