शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

खडवलीजवळ भातसा नदीत दोघे बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 04:51 IST

खडवली येथे भातसा नदीत मुंबईहून पिकनिकसाठी आलेले दोन जण बुडाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ४ च्या सुमारास घडली.

टिटवाळा (ठाणे) : खडवली येथे भातसा नदीत मुंबईहून पिकनिकसाठी आलेले दोन जण बुडाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ४ च्या सुमारास घडली. रामलखन राजाराम मौर्या (२५, रा. घाटकोपर ) आणि अभिजित कृष्णा बागवे (३७, रा. मानखुर्द) अशी त्यांची नावे आहेत. पोलीस आणि अग्निशमन दल त्यांचा नदीपात्रात शोध घेत असून २४ तास उलटूनही मृतदेह सापडले नसल्याची माहिती टिटवाळा पोलिसांनी दिली.ठाणे येथील इंडिया सुपर सर्व्हिसेस या कंपनीतील १० कामगार खडवली येथील भातसा नदी परिसरात पिकनिकसाठी आले होते. सर्वजण नदीपात्रात पोहण्यासाठी उतरले असता रामलखनला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. हे पाहताच त्याला वाचवण्यासाठी अभिजित यांनी प्रयत्न केले. मात्र, घाबरलेल्या रामलखनने अभिजित यांच्या कमरेला मिठी मारल्याने दोघेही बुडाले. इतर मित्रांनी त्यांना वाचवण्यासाठी आरडाओरड केली; मात्र ते दिसेनासे झाले होते.यानंतर, सर्वांनी टिटवाळा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या खडवली पोलीस चौकीत जाऊ न घटनेबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात शोधाशोध केली. अखेर, काहीच हाती न लागल्याने शोध थांबवण्यात आला. रविवारी सकाळी कल्याण अग्निशमन दलाच्या पथकाने शोधमोहीम सुरू केली. मात्र, २४ तास उलटूनही मृतदेह सापडले नसल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र आहिरराव यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेDeathमृत्यू