शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत एकाच दिवशी चार दुचाकींसह दोन रिक्षा चोरीच्या घटनांची नोंद

By नितीन पंडित | Updated: August 2, 2022 18:24 IST

भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाहन चोरीच्या घटना घडत असताना सोमवारी एकाच दिवसात शहरात चार दुचाकींसह दोन रिक्षा चोरीला गेल्याच्या घटनांची नोंद

नितिन पंडीत

भिवंडी :

भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाहन चोरीच्या घटना घडत असताना सोमवारी एकाच दिवसात शहरात चार दुचाकींसह दोन रिक्षा चोरीला गेल्याच्या घटनांची नोंद विविध पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आली आहे. शहरात रोजच्या वाहन चोरीच्या घटनांमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत तर पोलीस या वाहनचालकांचा शोध घ्यायचा कसा या विवंचनेत आहेत.त्यामध्ये एकट्या भोईवाडा पोलीस ठाणे हद्दीतील तीन गुन्हे घडले आहेत.

तबरेज सोहराब मोमीन यांनी ते राहत असलेल्या  स्काय अपार्टमेंट, जुनागौरी पाडा येथे आपली मोटार सायकल रात्री उभी करून ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादीच्या संमती शिवाय लबाडीने ते चोरी केली आहे.तर हाफिज नगर येथील सानिया अपार्टमेंट येथे राहणारे मोहंमद अफसर अन्वर अन्सारी यांनी होंडा कंपनीची डीयो दुचाकी इमारती खाली उभी केली असता ती रात्रीस चोरी झाल्याचे सकाळी आढळून आले.भंडारी कंपाऊंड नारपोली येथील गोलबाल हॉस्पिटल शेजारी राहणारे रिक्षा चालक प्रेमचंद सत्यनारायण पटेल यांनी सार्वजनिक रस्त्यावर आपली रिक्षा उभी करून ठेवली असता ती अज्ञात चोरट्याने पळवून नेली या तिन्ही प्रकरणात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

त्यासोबतच नारपोली पोलीस ठाणे हद्दीतील ओवळी गावात राहणारे वृषभ अरविंद पाटील याने आपली होंडा युनिकॉर्न दुचाकी घराबाहेर उभी करून ठेवली असता ती चोरीस गेली आहे .शहर पोलीस ठाणे हद्दीतील हनुमान टेकडी रोड वरील संगम बार जवळ राहणाऱ्या संगीता मुक्तवा बर्गी यांनी आपली स्कुटी या भागात उभी करून ठेवली असता सायंकाळी ती चोरीस गेली तर शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीत आशीषकुमार होरी लालपाल या रिक्षा चालकाने नागाव येथील यश हॉटेल शेजारील सार्वजनिक रस्त्यावर आपली रिक्षा उभी करून ठेवली असता ती चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे भिवंडी शहरात मागील काही दिवसात झालेल्या वाहन चोरीच्या घटनेत लक्षणीय वाढ झाली आहे ज्यामुळे नागरिकांसह पोलीस यंत्रणेची चिंता वाढली आहे.  

टॅग्स :BhiwandiभिवंडीCrime Newsगुन्हेगारी