शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

वासिंद येथून दोन रिव्हॉल्वर, जिवंत काडतुसांसह एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 21:53 IST

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे ग्रामीण पोलिसांनी वासिंद रेल्वे स्थानक परिसरातून अमीर खान याला दोन रिव्हॉल्व्हर आणि तीन जिवंत काडतुसांसह गुरुवारी अटक केली.

ठळक मुद्दे उत्तरप्रदेशातून केली होती शस्त्र खरेदी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई ठाणे स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक

ठाणे: बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणाऱ्या अमीर शब्बीर खान (२६, रा. टिटवाळा) याला गुरुवारी दुपारी ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वासिंद येथून अटक केली. त्याच्याकडून दोन रिव्हॉल्व्हर आणि तीन जिवंत काडतुसे हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हयात आचारसंहिता लागू झाल्यापासून पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाईचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. याच अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली वासिंद युनिटचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील, धनंजय पोरे आणि उपनिरीक्षक जी. एस. सुळे यांच्या पथकाने खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे वासिंद रेल्वे स्थानक पार्र्किंग परिसरात ४ एप्रिल रोजी सापळा लावला. तिथे खान हा संशयास्पदरित्या वावरतांना आढळला. तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांनाच त्याला या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन गावठी बनावटीचे पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे असा ६१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. त्याने उत्तरप्रदेशातून प्रत्येकी दहा हजारांमध्ये हे पिस्टल आणल्याचे सांगितले. त्याने यापूर्वीही अशी शस्त्रे आणली आहेत का? तो ठाणे ग्रामीण परिसरात ती कोणाला विकणार होता? याचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याविरुद्ध वासिंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या वासिंद युनिटचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस