शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत कोविड सेंटरच्या पंधराव्या मजल्याच्या बाथरूम खिडकीतून दोन कैदी पळाले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 22:09 IST

कल्याणच्या आधारवाडी कारागृहात कोरोनाने शिरकाव केला असून कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या ३० कैद्यांना काही दिवसापूर्वीच कोरोनाची लागण झाली होती.

नितिन पंडीत

भिवंडी - भिवंडी कल्याण बायपास मार्गावर असलेल्या रांजनोली येथील टाटा आमंत्रा कोविड  सेंटरच्या १५ व्या मजल्यावर कोरोना बाधित असलेल्या २ अट्टल कैद्यांवर उपचार सुरु असतानाच या दोन्ही कैद्यांनी बाथरूमच्या खिडकीच्या काचा काढत १५ व्या मजल्यावरून बाथरूमच्या पाईपवरून खाली उतरून पसार झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी पहाटे घडली आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात शुक्रवारी दोघा फरार आरोपींवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी शोध सुरु केला आहे. गाजीदारा जाफरी  (वय, २५) खुर्शीद अब्दुल हमिद शेख (वय ३३) असे फरार झालेल्या दोघा अट्टल कैद्यांची नावे आहेत.              कल्याणच्या आधारवाडी कारागृहात कोरोनाने शिरकाव केला असून कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या ३० कैद्यांना काही दिवसापूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. कोरोना बाधित या सर्व कैद्यांची  उपचारासाठी ठाणे येथील सिविल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यातच फरार झालेले गाजीदारा जाफरी आणि खुर्शीद या दोघांचाही शिक्षा भोगत असताना कारागृहात १९ एप्रिलला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे या दोघांना उपचारासाठी कल्याण - भिवंडी मार्गावर रांजणोली नाका  बायपास येथील  टाटा आमंत्रा कोविड  सेंटरच्या १५ व्या मजल्यावर उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचार सुरु असल्याचा फायदा घेत,  १५ मजल्यावरच्या रूममधील बाथरूमच्या खिडकीच्या काचा काढून त्यातून बाहेर पडत पाईपवरून खाली येत पळ काढला. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी या फरार कैदयांचा शोध सुरु केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जीवन शेरखाने करीत आहेत. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाbhiwandiभिवंडी