शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी करणाऱ्यामध्ये टोळीत कल्याण जेल मधून पळालेल्या दोन कैद्यांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 22:14 IST

भिवंडी : तालुक्यातील पुर्णा गावात प्रेरणा कॉम्प्लेक्स मधील गोदामाचे शटर उचकटून २ लाख ६७ हजार १०६ रूपयांचे कापड बनविण्यासाठी ...

ठळक मुद्देघरफोडी करून यार्नच्या गोणी चोरणाºया चौघांना अटकपकडलेल्या चोरांमध्ये दोन जेलमधून पळालेले कैदीचोरलेल्या यार्नच्या मालासह आरोपींना अटक

भिवंडी: तालुक्यातील पुर्णा गावात प्रेरणा कॉम्प्लेक्स मधील गोदामाचे शटर उचकटून २ लाख ६७ हजार १०६ रूपयांचे कापड बनविण्यासाठी लागणारे यार्नचे थैले पंधरा दिवसांपुर्वी चोरून नेले होते. या प्रकरणी पोलीसांनी चार जणांच्या टोळीस मुद्देमालासह अटक केली आहे. या आरोपींची अधिक चौकशी करता त्यामध्ये कल्याण आधारवाडी जेलमधून दहा वर्षापुर्वी पळालेले दोन कैदी आढळून आले.पुर्णा येथील प्रेरणा कॉम्प्लेक्समधील बी.एन.एस. रोज कॅरिअर्स या ट्रान्सपोर्टच्या गोदामात १ मार्च रोजी रात्री दरम्यान घरफोडी करून चोरांनी २ लाख ६७ हजार १०६ रूपयांचे यार्नचे थैले चोरले होते. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास करताना पोलीसांना खबऱ्याकडून माहिती मिळाली. त्यानुसार पोलीसांनी भादवड येथुन शादाब उर्फ पिल्ला अब्दुल वाहिद कुरेशी (२३), नागाव येथील आलमशेठ यांच्या कारखान्यातून सागर उर्फ शिवमंगल मिश्रा(३२)तर शिळफाटा कल्याण येथून दलाल रामलाल चौहाण(२३)व मुंबई मानखुर्द येथुन राजू उर्फ राजकुमार बरसाती हरिजन(३०) या चौघांना अटक करून त्यांच्याकडून चोरलेला यार्नचा सर्व माल जप्त केला. त्यांची अधिक चौकशी करता असे आढळून आले की, सागर उर्फ शिवमंगल मिश्रा व राजू उर्फ राजकुमार बरसाती हरिजन यांच्या विरोधात सन २००८ साली कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पोलीसांनी एका गुन्ह्यात अटक केली होती. त्यांना आधारवाडी जेलमध्ये पाठविण्यात आले होते. ते कैदेत असताना २ आॅक्टोंबर २००८ रोजी कल्याण येथील आधारवाडी जेलमधून ते दोघे पळून गेले होते. ते पळालेले कैदी दहा वर्षांनी या गुन्ह्यात निष्पन्न झाले आहेत. या सर्व आरोपींना न्यायालयाने जेलमध्ये रवाना केले आहेत.

टॅग्स :BhiwandiभिवंडीCrime Newsगुन्हेगारी