शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये खड्ड्यात गाडी घसरून अपघात, दोन जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 15:09 IST

रस्त्यावरील खड्ड्यामुळे घडला अपघात

कल्याण : कल्याण शहर परिसरातील असमान रस्ते आणि खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा नाहक बळी गेलेला असतानाच खड्ड्यांमुळे आणखी एक अपघात घडला आहे. कल्याण पूर्वेकडील नेतीवली चौक परिसरात पडलेल्या खड्ड्यात गाडी घसरून हा अपघात झाला. या अपघातात एक शिक्षिका आणि तिच्या मुलीला गंभीर दुखापत झाली आहे.

कल्याणच्या रामबाग परिसरात राहणाऱ्या शिक्षिका भारती नरे या त्यांची मुलगी सिद्धी हिला नांदीवली परिसरात असणाऱ्या शाळेतून घेऊन घरी परतत होत्या. बुधवारी ( 18 जुलै) दुपारी 4.15 वाजण्याच्या सुमारास नेतीवली चौकातून जात असताना रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे त्यांच्या अॅक्टिव्हा गाडीला अपघात झाला. यामुळे भारती आणि सिद्धी या दोघीही जखमी झाल्या आहेत. रस्त्यावरील खड्ड्यात टाकलेल्या खडीमुळे गाडी घसरल्याची माहिती भारती यांचे पती चेतन नरे यांनी दिली. या अपघातात भारती यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून प्लॅस्टर घालण्यात आले आहे. तर सिद्धीलाही बऱ्यापैकी मुका मार बसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आणखी कोणाचा जीव जाण्याच्या आत या मार्गावरील खड्डे दुरूस्त करण्याची मागणी चेतन यांनी केली आहे.

टॅग्स :kalyanकल्याणPotholeखड्डे