शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत दोन पाकिस्तानी नागरिकांचे वास्तव्य; न्यायालयाच्या आदेशाने नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

By नितीन पंडित | Updated: June 7, 2024 14:32 IST

न्यायालयच्या आदेशानुसार सविस्तर चौकशी सुरू असुन अद्याप कोणाला अटक केली नाही...

भिवंडी: शहरात शेकडो बांगलादेशी नागरीक पकडले गेले असतानाच शहरात १९७१ पासून दोन पाकिस्तानी नागरीक वास्तव्यास असल्या प्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात एकूण नऊ जणां विरोधात गुन्हा दाखल केला आहे.मात्र न्यायालयच्या आदेशानुसार सविस्तर चौकशी सुरू असुन अद्याप कोणाला अटक केली नाही.

         पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असगरअली मोहम्मद अली अन्सारी या ७० वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीने भिवंडीत हारुन उमर परकार व अस्लम उमर परकार हे जन्माने पाकिस्तानी नागरीक १९७१ पासून भिवंडी शहरात वास्तव्य करीत असून त्यांना आशिक अब्दुल रहमान परकार,अल्लाउददीन अब्दुल्लाह परकार,नाजीम कुरैशी,अशफाक अहमद मुशताक हाशमी,इजाज अहमद मुशताक हाशमी,हुसैन मेहमुद खान,रौफ हुसैन परकार अशा सात जणांनी ते पाकिस्तानी नागरीक असल्याचे माहीत असतानाही  त्यांना बनावट ओळखपत्र, व इतर कागदपत्र बनवुन देवून अवैधरीत्या भारतात प्रवेश करुन देवुन भारताच्या सुरक्षिततेस धोका निर्माण केला असल्याची तक्रार भिवंडी न्यायालयात दिली होती.

       या तक्रारीची दखल घेऊन न्यायालयाने शांतीनगर पोलिसांना गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले होते.त्यानंतर शांतीनगर पोलिस ठाण्यात असगर अली मोहम्मद अली अन्सारी यांच्या फिर्यादी वरून फसवणुकीसह परदेशी नागरी कायदा,पारपत्र अधिनियम १९६७ चे कलम १२ सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी या प्रकरणी अजून कोणालाही ताब्यात घेतले नसून या प्रकरणी तपास करीत आहेत.तपासाअंती पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली आहे. 

टॅग्स :Courtन्यायालयPoliceपोलिसbhiwandiभिवंडीPakistanपाकिस्तान