शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्य्रातील दोघांची कोरोनावर मात तर मुख्यालयातील एकासह चौघांना लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 23:06 IST

एकीकडे मुंब्रा पोलीस ठाण्यातील दोघे पोलीस कोरोनामुक्त झाले असतांनाच त्याच पोलीस ठाण्यातील एका महिलेसह दोघे, मुख्यालयातील एक आणि नौपाडा पोलीस ठाण्यातील एक अशा चौघा पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांची संख्या ही पुन्हा १८ वर गेली आहे.

ठळक मुद्देमुंब्य्रातील महिलेसह आणखी दोन पोलीस झाले कोरोनाबाधितदोन अधिकारी आणि १६ कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: एका महिला पोलीस अधिका-याला कोरोनाची लागण झाल्यानंतर आता ठाणे नियंत्रण कक्षातील आणखी एका पोलीस कर्मचा-याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर मुंब्रा पोलीस ठाण्यातील दोघांनी कोरोनावर मात केली असून अन्य एका महिला कर्मचा-यासह दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये कभी खुशी कभी गमचे वातावरण पहायला मिळत आहे.मुंबईत नागपाडा येथील नियुक्तीवरील उपनिरीक्षक ठाण्यात वास्तव्यास होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची उपनिरीक्षक पत्नी तसेच आई आणि दोन वर्षांची मुलगीही कोरोना पॉझिटिव्ह आढळली. या चौघांवरही मुंबईतील सेव्हन हिल्स या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने पोलीस वसाहत आणि नियंत्रण कक्षात काहीसे भीतीचे वातावरण असतांनाच शनिवारी नियंत्रण कक्षातील आणखी एका कर्मचाºयाची तपासणीही पॉझिटिव्ह आली. त्यानंतर नौपाडयातील एक कर्मचारी तर मुंब्रा पोलीस ठाण्यातील एक महिलेसह दोघांना रविवारी लागण झाली आहे. या चौघांनाही रुग्णालयात दाखल केले आहे.आतापर्यंत सहा अधिकारी आणि ३३ कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली. त्यातील चार अधिकारी आणि १५ कर्मचा-यांनी या आजारावर मात केली आहे. त्यामुळे आता दोन अधिकारी आणि १८ कर्मचा-यांवर वेगवेगळया रुग्णालयांमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, मुंब्य्रातील दोघांना भार्इंदर पाडा येथील उपचार केंद्रातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांचे ठाणे पोलिसांनी टाळया वाजवून स्वागत केले.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस