शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
2
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
3
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
4
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
5
'नीट' रद्द करून गैरप्रकारांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी
6
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
7
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
8
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
9
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
10
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
11
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
12
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
13
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
14
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
15
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
16
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
17
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
18
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
19
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
20
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?

ठाण्यात कोरोनाबाधीत आणखी दोघांचा मृत्यु तर डोंबिवलीत एकाचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 7:39 PM

ठाणे जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ही ४२३ वर जाऊन पोहचली आहे. तर ठाण्यात कोरोनाबाधीत रुग्णांपैकी दोघांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकाडा आता चारवर गेला आहे. तर डोंबिवलीतही आज एकाचा मृत्यु झाला आहे. तर जिल्ह्यात कोरोना बाधीत मृत्यु झालेल्यांची संख्या १५ वर गेली आहे.

ठाणे : ठाणे महानगर पालिकाक्षेत्रासह मीरा भार्इंदर, नवी मुंबई आणि कल्याण -डोंबिवली पालिकाक्षेत्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रु ग्णांच्या आकडेवारीत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे या चारही शहरात चिंतेचे वातावरण आहे. सोमवारी ठाण्यात दोघा कोरोना बाधीत रुग्णाचा मृत्यु झाला आहे. तर डोंबिवलीत आणखी एकाचा मृत्यु झाला आहे. सोमवारी ठाणे शहरात ०७ मीरा भार्इंदरमध्ये १२, नवी मुंबईत ०३ आणि कल्याण - डोंबिवलीत ३ आणि बदलापुरात दोन असे २८ नवीन रु ग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांचा आकडा ४२३ वर पोहोचला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. दुसरीकडे नवीमुंबईतील एका खाजगी कंपनीतील ४० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यातील सहा जणांचा अहवाल हा पॉझीटीव्ह आला आहे. विशेष म्हणजे यातील चार नागरीक हे ठाण्यात वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे.                   ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या ४२३ वर पोहोचली असून आता पर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात रविवारी ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीत एकाच दिवशी १९ नवीन रु ग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यात सोमवारी आणखी सात नव्या रुग्णंची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधीतांची संख्या १५५ वर पोहोचली असून आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला आहे. तसेच मीरा भार्इंदरमध्ये १२ नवीन रु ग्ण आढळून आल्याने ९४ इतकी संख्या झाली आहे. तर नवी मुंबई पालिका क्षेत्रात तीन नवे रु ग्ण आढळल्याने येथील रु ग्ग्णांची संख्या ६९ झाली आहे. तर, कल्याण डोंबिवली क्षेत्रात तीन नवीन रु ग्णांची नोंद करण्यात आल्यामुळे तेथील रु ग्णांचा आकडा ७८ वर पोहोचला आहे. तर डोंबिवलीत सोमवारी कोरोना बाधीत रुग्णाचा मृत्यु झाला आहे. विशेष म्हणजे सोमवारी या चार शहरांव्यतिरिक्त बदलापूरमध्ये दोन जणांना कोरोनाची लागण झाली. तर अंबरनाथ, ठाणे ग्रामीण आणि भिवंडी या शहरांमध्ये नव्या रु ग्णाची नोंद करण्यात आली नाही.ठाणे शहरातील करोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. रविवारी ठाण्यात १९ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर सोमवारी ठाण्यात नवीन ७ रु ग्ण सापडले सापडले आहेत. त्यामुळे ठाणे शहरातील रु ग्णांचा एकूण आकडा १५५ झाला आहे. दरम्यान सोमवारी टेकडी बंगला परिसरातील ६७ वर्षीय रुग्णाचा कोरोनाने मृत्यु झाला. त्यामुळे ठाण्यातील मृत्यु झालेल्या रुग्णांची संख्या ४ झाली आहे. दरम्यान दुसरीकडे लोकमान्य नगर भागातही एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यु झाला आहे. त्याला मधुमेह झाल्याने कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर १८ एप्रिल रोजी त्याचा मृत्यु झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात आला. परंतु त्याचा मृत्यु हा कोरोनामुळे झाल्याचा अहवाल आता रविवारी प्राप्त झाला आहे. या संदर्भात पालिकेशी संपर्क साधला असता उपायुक्त संदीप माळवी यांनी सदर रुग्ण हा मधुमेह उपचारासांठी कळवा रुग्णालयात दाखल झाल्याचे सांगितले.त्याच्यावर उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यु झाला. परंतु रविवारी त्याचा कोरोना चाचणीचा अहवाल प्राप्त झाला असून तो पॉझीटीव्ह आला आहे. मात्र त्याने या संदर्भात कोणत्याही स्वरुपाची माहिती रुग्णाने दिली नव्हती. सदर रुग्ण हा केवळ मधुमेहासाठी रुग्णालयात दाखल झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे सदर मृत व्यक्तीच्या अंतदर्शन अंत्यसंस्कारासाठी आणि ५० ते ६० नागरीक सहभागी झाले होते. दरम्यान आता अशा व्यक्तींचा शोध घेऊन येथील ५१ नागरीकांना घोडबंदर येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान आता लोकमान्य नगर आणि शास्त्री नगर या भागातील अत्यावश्यक सेवाही बंद करण्यात आल्या असल्याची माहिती स्थानिक नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी दिली. संबधीत व्यक्ती ही कोणाकोणाच्या संपर्कात आली होती, याचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी सोमवारी महापालिका अधिकाऱ्यांची एक बैठकही घेण्यात आली होती. त्यानुसार रविवारी पर्यंत या भागातील २२ पैकी ११ मेडीकल दुकाने उघडी राहणार असून दुधासाठी सकाळी दोन तासांचा कालावधी देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानुसार नागरीकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान डोंबिवलीतही सोमवारी एकाचा कोरोनामुळे मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांची संख्या १५ वर गेली आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या