शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

ओरिसामधून महाराष्ट्रात गांजाची तस्कारी करणाऱ्या आणखी दोघे जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 20:44 IST

ओरिसा येथून महाराष्ट्रात गांजाची तस्करी करणाºया प्रशांत नायक (३०, रा. गंजाम, ओरिसा) आणि अरमान पटेल (३५, रा. बदलापूर, ठाणे ) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने गुरुवारी अटक केली आहे.

ठळक मुद्देआठ लाख ५४ हजारांचा ३४ किलो गांजा जप्तठाणे गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ओरिसा येथून महाराष्ट्रात गांजाची तस्करी करणाºया प्रशांत नायक (३०, रा. गंजाम, ओरिसा) आणि अरमान पटेल (३५, रा. बदलापूर, ठाणे ) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने गुरुवारी अटक केली आहे. त्यांच्याकडून आठ लाख ५४ हजारांचा ३४ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे ओरिसा आणि महाराष्ट्रातील गांजा तस्करीचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. याचाच फायदा बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांकडूनही घेण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे. त्यामुळेच ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंह यांनीही अशा बेकायदेशीर धंद्यांवर कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त सिंह यांनी सर्व पोलीस ठाण्यांसह गुन्हे शाखेला दिले आहेत. त्यानुसार गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनीही गुन्हे शाखेच्या पथकांना कारवाईचे आदेश बजावले आहेत. दरम्यान, ठाण्यात मोठया प्रमाणात गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना २ सप्टेंबर रोजी मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे घोडके यांच्यासह निरीक्षक अरुण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे यांच्या पथकाने घोडबंदर रोडवरील कासारवडवली भागात गांजा विक्रीसाठी आलेल्या प्रशांत आणि अरमान या दोघांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे हे करीत आहे.* एका आठवडयात तिसरी कारवाई-ठाणे पोलिसांनी एका आठवडयात ही तिसरी कारवाई केली असून यापूर्वीही ठाणेनगर पोलिसांनी ओरिसातून गांजा आलेल्या चौघांना अटक करुन त्यांच्याकडून ५५ किलोचा गांजा हस्तगत केला आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी