शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांत ३६ घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:12 IST

३७ लाखांचा ऐवज चोरीला; पोलिसांपुढे तपासाचे आव्हान

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरांत १ जानेवारी ते १३ मार्चपर्यंतच्या कालावधीत चोरट्यांनी ३६ ठिकाणी घरफोड्या करत ३७ लाख ८७ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरला. घरफोडीच्या सर्वाधिक १३ घटना मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. एप्रिलमध्ये शाळांना सुटी लागल्यानंतर अनेक नागरिक बाहेरगावी जातात. या काळात चोरीच्या घटना वाढतात. त्यातच यंदा निवडणूक असल्याने पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.कल्याण-डोंबिवली परिसरांत घरफोड्यांबरोबर, रस्त्यात अडवून लूटमार, दुचाकीचोरीच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. उन्हाळ्याच्या सुटीत नागरिक गावी अथवा पर्यटनाला जातात. अशा वेळी चोरटे अनेक दिवस बंद असलेली घरे टार्गेट करतात. अनेकदा घरमालक घरी परतल्यानंतरच अशा घटना उघडकीस येतात. सुटीच्या काळातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये धाकधूक असते. त्यामुळे अनेकदा पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी होते.मात्र, चोरीच्या घटना घडू नयेत, यासाठी काय खबरदारी घ्यावी, याबाबत आम्ही जनजागृती करत आहे. सुटीच्या काळात बाहेर जाताना नागरिकांनी आपल्या शेजाऱ्यांना घराकडे लक्ष देण्यास सांगावे. गृहसंकुलातील सुरक्षारक्षकांना सतर्क राहण्यास सूचित करावे. घरातील सोने, किमती वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्यात. गृहसंकुलात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशा सूचना डोंबिवलीचे सहायक पोलीस आयुक्त दिलीप राऊत यांनी केल्या आहेत.

टॅग्स :theftचोरी