शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

भिवंडीचे दोन मोबाईल चोर ठाण्यात गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 20:31 IST

बेसावध लोकांचे मोबाईल फोन चोरून मोटारसायकलवर फरार होणाऱ्या भिवंडीच्या दोन चोरांना चितळसर पोलिसांनी गजाआड केले.

ठळक मुद्देचितळसर पोलिसांची कामगिरी२५ मोबाईल हस्तगतमोटारसायकलही जप्त

ठाणे : मोटारसायकलवर फरार होण्याच्या बेतात असलेल्या दोन मोबाईल चोरांना चितळसर पोलिसांनी शुक्रवारी शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून चोरीचे २५ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले.चितळसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल घुगे आणि सहायक पोलीस निरीक्षक प्रविण बनगोसावी यांचे पथक शुक्रवारी गस्त घालत असताना विनाक्रमांकाच्या मोटारसायकलवर दोन युवक कापूरबावडी नाक्याकडून घोडबंदर रोडकडे जाताना दिसले. पोलिसांनी विचारपूस करण्यासाठी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून तत्त्वज्ञान सिग्नलच्या सर्व्हिस रोडवरील पेट्रोल पंपाजवळ त्यांना अडवले. त्यांच्याजवळ मोटारसायकलची कोणतीही कागदपत्रे नसल्याने पोलिसांना संशय आला. त्यांची कसून चौकशी केली असता दोन्ही युवक मोबाईल चोर असल्याची माहिती उघडकीस आली.आमिर उर्फ अरबाज अस्लम खान आणि रिजवान उर्फ बाबू निजामोद्दीन अन्सारी ही आरोपींची नावे असून, दोघेही भिवंडीचे रहिवासी आहेत. घोडबंदर रोडवरील आनंदनगर चेकनाका ते कासारवडवली परिसरात त्यांनी मोबाईल चोरीचे अनेक गुन्हे केल्याची माहिती चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. चोरीचे काही मोबाईल फोन आरोपींच्या घरझडतीतून मिळाले. काही मोबाईल फोन त्यांनी दुकानदार तसेच नागरिकांनाही विकले होते. आरोपींकडून चोरीचे २५ मोबाईल फोन आणि गुन्ह्यासाठी वापरलेली मोटारसायकल असा ३ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, ते आणखी कोणत्या गुन्ह्यामध्ये सहभागी आहेत का, याची चौकशी सुरू असल्याचे गणपतराव पिंगळे यांनी सांगितले. बेसावध असलेल्या नागरिकांचे मोबाईल फोन चोरण्याचे अनेक गुन्हे आरोपींनी घोडबंदर रोडवर केले आहेत. आरोपींकडून हस्तगत केलेले २५ मोबाईल फोन घोडबंदर रोडवरील रहिवाशांचे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुणाचा मोबाईल फोन चोरी गेला असल्यास त्यांनी आयएमइआय क्रमांक घेऊन चितळसर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाPoliceपोलिस