शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाख १२ हजार रोपांची लागवड

By admin | Updated: July 2, 2017 05:59 IST

राज्य शासनाच्या ४ कोटी वृक्षलागवड मोहिमेंतर्गत ठाणे जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार २ लाख १२ हजार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्य शासनाच्या ४ कोटी वृक्षलागवड मोहिमेंतर्गत ठाणे जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार २ लाख १२ हजार इतकी रोपे लावण्यात आली आहेत. वन विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसह इतर सर्व शासकीय विभागांनी मिळून केलेले हे वृक्षारोपण आहे, अशी माहिती उपमुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली.जिल्ह्यातील मुख्य समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवर, आध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ऐरोली येथे झाला. तर, मुंब्रा बायपास रोडवरील खारिवलीदेवी मंदिराच्या पायथ्याशी कदंब वृक्षाचे रोपटे लावून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरात या योजनेचा शुभारंभ केला. या वेळी आमदार सुभाष भोईर, रवींद्र फाटक, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, उपायुक्त ओमप्रकाश दिवटे आणि वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाभरात यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कृषी दिनानिमित्त शनिवारी गृह विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह यांच्या हस्ते ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या बाहेरील परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी २०० हून अधिक झाडांची लागवड करण्यात आली. प्रसंगी कारागृह अधीक्षक नितीन वायचळ उपस्थित होते. तसेच, सिंह यांनी कारागृहातील कारखाना, बेकरी, शिवणकाम, महिला विभाग आदी विभागांना भेट देऊन कारागृहाची पाहणी केली. ५० हजार झाडे लावणारकल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांत महापालिका या मोहिमेंतर्गत आठवडाभरात ५० हजार वृक्षांची लागवड करणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ वृक्षदिंडी काढून करण्यात आला. या वेळी सुमारे ६०० विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली होती. वृक्षदिंडीला महापौर राजेंद्र देवळेकर यांनी नारळ फोडून दिंडीचा शुभारंभ केला. रोटरी क्लब, औद्योगिक विभाग, टिळकनगर विद्यालय, धडपड व्यासपीठ व कल्याण-डोंबिवली महापालिका उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभाग यांच्यातर्फे ही दिंडी काढण्यात आली. त्यात वृक्षप्रेमी नागरिक व डोंबिवली विभागातील २५ शाळांनी सहभाग घेतला होता. दिंडीचा समारोप एमआयडीसीतील ज्ञानमंदिर शाळेजवळ झाला. कसाऱ्यात वृक्षदिंडीकसारा : कसाऱ्यातील शेठ बा.ह. अग्रवाल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनंदा तायडे- हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या वृक्षदिंडीत विद्यार्थ्यांसह शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.नारायणगावात उपक्रमशेणवा : मळेगाव ग्रुपग्रामपंचायतीच्या वतीने नारायणगावात वृक्षलागवड करण्यात आली, या वेळी सरपंच दीक्षा पडवळ, उपसरपंच अमृता वरकुटे, सदस्य वैभव पडवळ, विलास वरकुटे, ग्रामसेवक एच. खाडे, शिपाई कैलास शिर्के, सोमनाथ शिर्के यांच्यासह गावकरी उपस्थित होते. येथील संघर्ष पत्रकार सेवाभावी संघाच्या वतीने वेलोशी येथे वृक्षलागवड करण्यात आली.४४ हजार झाडांचे लक्ष्यअनगाव : भिवंडी तालुका व पडघा वन विभागाच्या वतीने शनिवारी १० हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. तालुक्यात १२० ग्रामपंचायतींत ४४ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली असल्याची माहिती गटविकास अधिकारी हनुमंत दोडके यांनी दिली.मानवेल बांबूंची लागवडशहापूर : शहापूर वन विभागामार्फत वनप्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते मानवेल जातीच्या बांबूंची लागवड करून वृक्षारोपण सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी माजी आमदार दौलत दरोडा, तहसीलदार रवींद्र बावीस्कर, पोलीस उपअधीक्षक विशाल ठाकूर, भाजपाचे अशोक इरनक, काशिनाथ भाकरे, शहापूरचे उपवनसंरक्षक डी.पी. निकम, वनप्रशिक्षण संस्थेचे संचालक चंद्रकांत भारमल, सहायक उपवनसंरक्षक एस.पी. चव्हाण, वनक्षेत्रपाल एन. जी. कोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.लग्नाआधी वृक्षारोपण : राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे पुतणे संग्राम तावडे आणि नववधू प्राजक्ता जोशी यांनी मात्र लग्नाचे सात फेरे घेण्याआधी वृक्षारोपण करून नवीन पिढीला अनोखा संदेश दिला. विनोद तावडे यांच्या उपस्थितीत संग्राम तावडे आणि त्यांची पत्नी प्राजक्ता जोशी यांनी लग्नाच्याच हॉलमध्ये सकाळी लवकर येऊन वृक्षारोपण केले.