शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाख करदात्यांनी मालमत्ताकर भरलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 03:07 IST

आयुक्तांनी घेतला आढावा : डिसेंबरअखेरपर्यंत ५०० कोटी वसुलीचे उद्दिष्ट

ठाणे : मालमत्ताकर आणि पाणीपट्टी वसुलीचा वेग वाढविण्याबरोबरच येत्या डिसेंबर अखेरपर्यंत ५०० कोटी रुपयांच्या वसुलीचे नियोजन करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी महापालिका मुख्यालयात आढावा बैठकीत दिले. शहरातील सुमारे दोन लाखाहून अधिक मालमत्ताधारकांकडून कर वसुलीसाठी प्रभाग समितीनिहाय विशेष वसुली मोहिम राबविण्याबरोबरच वेळप्रसंगी कडक कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

या आढावा बैठकीत बोलताना आयुक्तांनी मालमत्ताकर आणि पाणीपट्टी वसुलीचा आढावा घेतानाच डिसेंबर अखेर वसुली उद्दीष्टाच्या ८४ टक्के म्हणजेच जवळपास ५०० कोटी रुपये करण्याच्यादृष्टीने नियोजन करण्याचे सक्त निर्देश दिले. अस्तित्वातील मालमत्तांची वसुली करण्याबरोबरच नवीन मालमत्तांची करआकारणी २५ डिसेंबरपर्यंत करून तसे प्रमाणपत्र संबंधित कर निरीक्षकांनी सादर करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. त्याचबरोबर वापरात बदल किंवा अनिवासी भाडेतत्त्वावरील कर आकारणीची कार्यवाहीही २५ डिसेंबर अखेर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पाणीपट्टी वसुलीबाबत बोलताना आयुक्तांनी प्रभाग समित्यांचे सहाय्यक आयुक्त तसेच कार्यकारी अभियंता यांनी एकित्रतपणे डिसेंबर अखेर ८० टक्के वसुली करण्याच्या सूचना दिल्या.थकबाकीदारांच्या वसुलीस प्राधान्यमंगळवार अखेर अंदाजे ३०२ कोटी मालमत्ताकराची वसुली झाली आहे. ती ही निर्धारित उद्दीष्टाच्या ५० टक्केपेक्षा जास्त झाली आहे. जवळपास ४.७५ लक्ष मालमत्ताकराची देयके वितरित केली असून त्यापैकी जवळपास २.६६ लक्ष ग्राहकांनी आपला कर भरला आहे.उर्वरीत २.०९ लक्ष लोकांनी आपला मालमत्ता कर भरावा यासाठी प्रभाग समितीनिहाय विशेष वसुली मोहिम राबविण्याच्या सूचना आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.त्याचप्रमाणे ब्लॉकनिहाय पहिल्या ५० थकबाकीदारांची यादी तयार करून त्यांच्याकडून वसुली करण्याला प्राध्यान्य देण्याच्या सूचना देतानाच पहिल्या सहामाहीमधील थकबाकीदारांकडील वसुली करण्यावर भर देण्यासही सांगितले.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाTaxकर