शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

सोशल मीडियावर महिलेला त्रास देणाऱ्या दोघांची हत्या; कसारा घाटातच मृतदेह फेकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 23:42 IST

एकच दिवशी दोन मृतदेह भेटल्याने  जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी घटनास्थळ भेट देत तपास यंत्रणा कार्यन्वीत केली.

शाम धुमाळ

कसारा - कसारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन अज्ञात व्यक्तीचे मृतदेह मुंबई - नाशिक महामार्गालगत असलेल्या खड्यात फेकले असल्याची माहिती कसारा पोलिसांना १९ जून रोजी सकाळ च्या सुमारास मिळाली होती. ही माहिती मिळताच कसारा पोलिस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेेतली

पहिला मृतदेह  नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटातील ब्रेक फेल पॉईंट व दुसरा मृतदेह  वाशाळा फाटा या ठिकाणी सापडला होता दोन्ही मृतदेहा बाबत पोलिसांनी डॉग स्कॉड,फिंगर प्रिंट एक्सपर्ट ,फॉरेनसिक लॅब ला पाचरन करून पंचनामा केला असता त्यांचा खून करून मृतदेह घाटात फेकल्याचे निदर्शनात आले त्या नुसार  कसारा पोलिसांनी मृतदेह शवविचेदनासाठी पाठवून पुढील तपास सुरु केला .एकच दिवशी दोन मृतदेह भेटल्याने  जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी घटनास्थळ भेट देत तपास यंत्रणा कार्यन्वीत केली.

पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने ,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ दीपाली धाटे, उपविभागीय पोलीस अधीक्षक मिलिंद शिंदे यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रमेश तडवी, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी सुरेश मनोरे यांनी तपास पथक तयार करून मयता चे वारस यांचा तपास दुसऱ्याच दिवशी केला. त्यानंतर मिळालेल्या तांत्रिक माहिती नुसार पोलिसांनी दोन पथक तयार करून शिर्डी जवळील लोणी परिसरात तपास सुरु केला. तब्बल दोन महिन्याच्या अथक मेहनतीनंतर पोलिसांना हुलकवणी देणाऱ्या 4 आरोपींना आज  शिर्डी परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. मनोज शिवप्पा नाशी वय 24 , कुणाल प्रकाश मुदलियार वय 23, प्रशांत अंबादास खुलुले वय 25 . फिरोज दिलदार पठाण वय 19 सर्व राहणार  राम नगर ,शिर्डी.अशी अटक केलेल्या आरोपीची नावे असून आरोपीनी आपला गुन्हा कबूल केला असून 4 जणांनी दोघांचा खून केल्याची कबुली दिली आहे.

मानलेल्या बहिणीला सोशल मीडियावर त्रास देत असल्याने केला खून.दरम्यान या दुहेरी खुनातील मुख्य आरोपी मनोज नाशी याच्या लोणी येथील मानलेल्या बहिणीस  मयत सुफीयान सिराबक्ष घोणे वय 33 रा.लोणी, व साहिल पठाण वय 21 रा.सोनगाव हे अनेक दिवसापासून सोशल मीडियावर आरोपीच्या मानलेल्या बहिणीला त्रास देत होते याचा राग मनात ठेवून मुख्य आरोपी मनोज याने आपल्या साथी दारांच्या मदतीने शिर्डी परिसरात सुफीयाना घोणे व साहिल पठाण यांचा खून केला व त्यांचा मृतदेह चादरीत गुंडाळून तो कसारा घाटात वेगवेगळ्या ठिकाणी फेकला असल्याची कबुली आरोपीनी पोलिसांना दिली.

या दुहेरी हत्याकांडातील आरोपी दोन महिन्याच्या अथक मेहनती नंतर अटक करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेचे,सहाय्य्क पोलीस निरीक्षक भास्कर जाधव,महेश कदम,प्रकाश साहिल,गोविंद कोळी,संतोष सुर्वे,सुनील कदम,स्वप्नील बोडके,सतीश कोळी, कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सलमान खातीब,पोलीस कर्मचारी अनिल निवळे,संदीप माळी यांचे कौतुक होत असून समज माद्यमावर बहिणीची छेड काढणाऱ्या दुखली चा खून करून त्याचा मृतदेह कसारा घाटात फेकणाऱ्या आरोपीना न्यायालयात् हजर करण्यात आले असून त्यांना पोलीस कोठंडी देण्यात आल्याचे समजते.