शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकल चोरीसह पोलिसांवरही हल्ला करणाऱ्या टोळीतील दोघे अल्पवयीन आंबिवलीतून जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 19:18 IST

मुंबई ठाण्यासह भिवंडी शहरात घरफोडया, वाहन चोरी तसेच पोलिसांवर हल्ले करणे अशा गंभीर स्वरुपाच्या गुन्हयांची नोंद असलेल्या दोन अल्पवयीन सराईत गुन्हेगारांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने आंबिवलीच्या इराणीवाडी येथून शनिवारी अटक केली आहे.

ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेची कारवाईएकाच रात्रीत भिवंडी, कळवा आणि नौपाडयातही चोरी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मुंबई ठाण्यासह भिवंडी शहरात घरफोडया, वाहन चोरी तसेच पोलिसांवर हल्ले करणे अशा गंभीर स्वरुपाच्या गुन्हयांची नोंद असलेल्या दोन अल्पवयीन सराईत गुन्हेगारांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने आंबिवलीच्या इराणीवाडी येथून शनिवारी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीतील सात मोटारसायकली आणि चार मोबाईल असा पाच लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.मोटारसायकलींची चोरी केल्यानंतर त्यांचा वापर महिलांच्या गळयातील सोनसाखळीची जबरीने चोरी करण्यासाठी केला जाणार असल्याचा संशय पोलिसांना असून त्या अनुषंगाने तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. भिवंडीतील शांतीनगर, माणकोली त्यापाठोपाठ ठाणे शहरातील कळवा, नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आठ जणांच्या एका टोळीने एकाच दिवशी मोटारसायकली चोरी करून एका पोलीस बिट मार्शलवर हल्ला झाल्याची घटना २१ मार्च रोजी घडली होती. हा तपास सुरु असतांना या टोळीतील दोघे जण आंबिवलीच्या इराणीवाडीत दडून बसल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकचे सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल जाधव यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जाधव यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक कैलास सोनवणे, अंमलदार आनंदा भिलारे, रवींद्र पाटील , रिझवार सय्यद, विक्रांत कांबळे आणि तेजश्री शेळके आदींच्या पथकाने आंबिवलीच्या इराणीवाडीत २७ मार्च रोजी छापा टाकून दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले.चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर मोटारसायकली इराणी वाडी येथे लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलीस पथकाने चोरीच्या सात मोटारसायकली त्यांच्याकडून हस्तगत केल्या आहेत. या प्रकरणी दोघांना अटक करून अधिक चौकशी केली असता, आठ जणांची टोळी यामध्ये असून या टोळीने एकाच दिवशी आठ मोटारसायकली चोरी केल्याची बाब समोर आली. त्यापैकी एक मोटारसायकल भिवंडी येथे एका पोलिसाच्या अंगावर चढविण्याच्या प्रयत्नात घसरल्यामुळे ती तिथेच टाकून या दोघांनी इतर साथीदारांच्या मोटारसायकवरून पळ काढला होता. भिवंडी, ठाणे आणि मुलुंड परिसरातुन या मोटरसायकली चोरी केल्याची कबुलीही त्यांनी दिली. या मोटारसायकली इराणी वाडीतील सराईत सोनसाखळी चोरांना चोरी करण्यासाठी विकणार होते अशी धक्कादायक माहिती दोघांच्या चौकशीतून समोर आली आहे. गुन्हे शाखेने या दोघांवर गुन्हे दाखल करून त्यांची रवानगी बालसुधारगृहात केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी