शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

दोन महिन्याचे वेतन थकल्याने केडीएमटीच्या कामगारांचे दोन तास काम बंद आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 16:43 IST

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवा उपक्रमाच्या कामगारांचे वेतन दोन महिन्यापासून थकल्याने परिवहन मजदूर युनियन या संघटनेच्या वतीने गणोशघाट बस डेपोजवळ दोन तास काम बंद आंदोलन केले. या आंदोलनस धडक कामगार युनियनने पाठिंबा दिला.

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवा उपक्रमाच्या कामगारांचे वेतन दोन महिन्यापासून थकल्याने परिवहन मजदूर युनियन या संघटनेच्या वतीने गणोशघाट बस डेपोजवळ दोन तास काम बंद आंदोलन केले. या आंदोलनस धडक कामगार युनियनने पाठिंबा दिला. या काम बंद आंदोलनापश्चात संघटनेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांची भेट घेऊन चर्चा केली असता थकीत दोन महिन्याच्या वेतनापैकी एक महिन्याचे वेतन तातडीने देण्यात येईल असे आश्वासन शिष्टमंडळास दिले आहे. दुपारनंतर कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. 

परिवहनच्या कामगारांचे पगार दोन महिन्यापासून थकल्याने परिवहन मजदूर युनियनचे अध्यक्ष अरविंद मोरे यांनी आज सोमवारपासून चक्का बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. कल्याण पश्चिमेतील गणोशघाट बस डेपोजवळ युनियनतर्फे प्रवेशद्वार सभा सुरु करण्यात आली. विद्याथ्र्याच्या परिक्षा सुरु असल्याने विद्याथ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी चक्का जाम आंदोलन दुपारी 12 वाजता सुरु करण्याचे आवाहन केले. चक्का जाम आंदोलन सुरु होण्यापूर्वी सकाळच्या सत्रत काही बसेस परिचलनासाठी बाहेर पडल्या होत्या. कामगारांनी थकीत वेतनाच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन सुरु केले. या आंदोलनास धडक युनियनचे अभिजीत राणो यांनी जाहीर पाठिंबा दिला. आंदोलनाच्या ठिकाणी राणे यांनी भेट दिली. राणे व मोरे यांनी महापालिका मुख्यालयात येऊन आयुक्त वेलरासू यांची भेट घेऊन कामगारांचे थकीत वेतन द्यावे अशी मागणी केली. आयुक्तांनी एक महिन्याचे थकीत वेतन तातडीने देण्याची व्यवस्था करतो. आणखी एका महिन्याचे थकीत वेतन येत्या 15 मार्च र्पयत देण्याची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन दिले आहे. याशिवाय महापौर व स्थायी समिती सभापती यांच्या अध्यक्षतेखाली एक कृती समिती स्थापन केली जाणार आहे.

या समितीच्या माध्यमातून परिवहनच्या समस्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील. समितीच्या शिफारसीनुसार पुढील निर्णय घेतले जातील असे सांगण्यात आले. परिवहन उपक्रमातून उत्पन्न मिळत नसून केवळ परिवहन उपक्रम महापालिकेच्या अनुदानावर चालविला जात आहे. त्यातून आर्थिक समस्यांना तोंड देण्यासाठी परिवहन सक्षम नाही. त्यामुळे परिवहन उपक्रमाचे खाजगीकरण करण्याची भाषा स्थायी समिती राहूल दामले यांनी केली होती. याविषयी मोरे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, परिवहनच्या कामगारांना आधी महापालिकेच्या सेवेत समाविष्ट करुन घ्यावे. त्यानंतर प्रशासनाने परिवहनचे खाजगीकरण करावे असे स्पष्ट केले आहे. परिवहन उपक्रमाची मान्यताप्राप्त संघटना कामगारांच्या प्रश्नावर प्रशासनाकडे पाठपुरावा करीत नाही. मान्यताप्राप्त संघटनेच्या वतीने 1 मार्च रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन परिवहन सभापती दालनासमोर करण्यात आलेले. पगार देण्याचे अधिकार सभापतीकडे नसताना त्यांच्या दालनासमोर आंदोलन करुन काय साध्य झाले असा सवाल मोरे यांनी उपस्थित करुन मान्यताप्राप्त संघटनेचा ठिय्या आंदोलनाचा केवळ दिखावा होता. त्यातून प्रश्न काही सुटला नाही. 

टॅग्स :kalyanकल्याण