शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

अतिधोकादायक गोडसे इमारतीचे दोन मजले निष्कासित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 19:06 IST

पार्वती इमारतधारकांचा दुरुस्ति करण्याचा दावा; प्रभाग क्षेत्र अधिकारी निर्णयावर ठाम

ठळक मुद्देती इमारत जीर्ण झाली असून तिस-या मजल्यावरील गॅलरीला बांबुचा आधार देण्यात आला आहे. त्यासंदर्भात वरिष्ठांशी बोलून अल्पावधीतच अंतिम निर्णय घेतला जाईल असेही शिंदे म्हणाले.

डोंबिवली - पश्चिमेकडील अतिधोकादायक गोडसे इमारतीमधील दुस-या मजल्यावरील एका घरातील प्लास्टर अंगावर पडुन विकास फडके यांचा मृत्यू झाल्यानंतर कल्याण डोंबिवली महापालिकेने गुरुवारपासून ती इमारत निष्कासीत करण्याचे काम हाती घेतले. शुक्रवारी दोन्ही मजले पाडण्यात आले असून संध्याकाळी गाळे पाडण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. शनिवारी ते काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.ह प्रभाग क्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर कंखरे हे घटनास्थळी असून ठेकेदाराचे ३० कामगार, महापालिकेचे १० कर्मचारी, आणि महापालिकेचे ९ पोलीस आणि विष्णुनगर पोलीस ठाण्याचे ५, आणि वाहतूक विभागाचे सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले. या सगळयांच्या माध्यमातून ती इमारत पूर्णपणे निष्कासीत करण्याचे काम सुरु होते. ते म्हणाले की, सर्व रहिवासी,गाळेधारक यांना भोगवटाप्रमाणपत्र देण्यात आले असून कोणाचेही तेथे सामान नाही. गाळेधारकांनाही सामान काढण्याचे आदेश दिले होेते, त्यानूसार गाळेधारकांनीही सामान काढले, आणि पाडकाम जलद गतीने पुढे सरकल्याचे ते म्हणाले. शुक्रवारी बहुतांशी काम झाले असून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महात्मा फुले रस्ता महात्मा गांधी शाळेपर्यंत रहदारीसाठी बंद ठेवण्यात आल्याचे ते म्हणाले. तसेच पादचा-यांनाही शक्यतोवर तेथून जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले होते. तरीही परिसरातच बहुतांशी इमारती असल्याने अनेकांना तेथून बाजुला करतांना प्रशासनाच्या नाकीनऊ आले होते.दरम्यान, पूर्वेकडील पाटकर रस्त्यालगत असलेल्या पार्वती या तीन मजली इमारतीला गुरुवारी रात्री महापालिकेने सील ठोकले होते. त्या ठिकाणी शुक्रवारी सकाळपासून रहिवासी, गाळेधारकांनी ठाण मांडले होते. इमारतीला धोका नाही असा दावा करत ते म्हणाले की, महापालिकेने मार्गदर्शन करावे आणि त्यानूसार आम्ही दुरुस्ति करायला तयार आहोत. परंतू महापालिकेचे फ प्रभागक्षेत्र अधिकारी दिपक शिंदे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, त्या ४२ वर्ष जुन्या इमारतीची डागडुजी करता येणे शक्य नाही. तसेच ती इमारत जीर्ण झाली असून तिस-या मजल्यावरील गॅलरीला बांबुचा आधार देण्यात आला आहे. तरीही इमारत निष्कासीत करु नका अशी भूमिका तेथील धारक कसे काय करत आहेत? असा सवाल त्यांनी केला. ती इमारत निष्कासीत करण्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यासंदर्भात वरिष्ठांशी बोलून अल्पावधीतच अंतिम निर्णय घेतला जाईल असेही शिंदे म्हणाले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीBuilding Collapseडोंगरी इमारत दुर्घटनाMuncipal Corporationनगर पालिका