शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील एका दुकानासह घराला शॉटसर्कीटमुळे आग: अग्निशमन दलाच्या तीन जवानांसह सातजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 23:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यातील वागळे इस्टेट येथील एका दुकानाला आग लागल्याची घटना शनिवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास ...

ठळक मुद्दे आगीमध्ये सिलेंडरचा स्फोटदुकानासह घराचेही मोठया प्रमाणात नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यातील वागळे इस्टेट येथील एका दुकानाला आग लागल्याची घटना शनिवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत आगीवर नियंत्रण मिळवितांना ठाणे अग्निशमन दलाचे लिडींग फायरमन शरद कदम (५६), जवान दीपेश पेटकर (२६) आणि शीघ्र कृती वाहनाचे चालक प्रसाद सुतार (२५) यांच्यासह सात जण जखमी झाले. त्यांच्यावर स्थानिक रु ग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.वागळे इस्टेट, रामनगर येथील तळ अधिक एक मजली असलेल्या ‘मर्द मराठा आॅटो स्पेअर पार्ट’ या दुकानासह बाजूलाच असलेल्या एका घराला ९ जानेवारी रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आगीची ही माहिती मिळताच प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागासह ठाणे महापालिकेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दोन फायर इंजिन, दोन रेस्क्यू वाहने आणि एका वॉटर टँकरच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यासाठी वागळे इस्टेट अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्याचवेळी रामसिंग यादव यांच्या घरातील एलपीजी सिलेंडरचा आगीमुळे स्फोट झाला. याच स्फोटामुळे लीडींग फायरमन कदम यांच्या दोन्ही हातांना जखमा झाल्या. त्यांचे सहकारी पेटकर यांच्या डोक्याला गंभीर मार लागून जखमी झाले. तर वाहन चालक प्रसाद सुतार यांच्यासह नितीन कदम (२०), केशव सकपाळ (५५), रोहन पांढरे(२१) आणि मंगेश कदम (४०) हे स्थानिक नागरिकही आग विझवितांना जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. सुमारे दोन ते तीन तासांनी आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. दरम्यान, या आगीमध्ये मोठया प्रमाणात घरासह दुकानाचे नुकसान झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली.* शॉटसर्कीटमुळे आगीची शक्यता:आगीचे नेमकी कारण समजू शकले नसले तरी शॉटसर्कीटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. स्पेअर पार्टच्या दुकानांमध्ये असलेल्या आॅईलच्या डब्यांमुळेही आगीचा मोठा भडका उडाला. त्यात दुकानाच्या वर असलेल्या घरातील सिलेंडरचाही स्फोट झाल्यामुळे आगीमध्ये आणखी भर पडली. या आगीची चौकशी करण्यात येत असल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेfireआग