शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

heatstroke:तीव्र उन्हाळ्याच्या मुक्या प्राण्यांनाही झळा, उष्माघाताने ठाण्यात दोन श्वानांचा झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 05:56 IST

Thane News: तापमानाच्या वाढत्या पाऱ्याचा तडाखा प्राणी, पक्ष्यांनाही बसला आहे. उन्हाच्या त्रासामुळे ठाणेकरांची  दवाखान्यांत जशी गर्दी दिसून येत आहे तसेच प्राणी, पक्ष्यांनाही रुग्णालयात उपचारासाठी नेले जात आहे.

- प्रज्ञा म्हात्रे ठाणे : तापमानाच्या वाढत्या पाऱ्याचा तडाखा प्राणी, पक्ष्यांनाही बसला आहे. उन्हाच्या त्रासामुळे ठाणेकरांची  दवाखान्यांत जशी गर्दी दिसून येत आहे तसेच प्राणी, पक्ष्यांनाही रुग्णालयात उपचारासाठी नेले जात आहे.

१५ दिवसांत १७ पक्ष्यांना उष्माघाताचा फटका बसला असून, ते एसपीसीए रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत, तर कँप  फाउंडेशनला आठवड्याला ३५ आजारी पशू-पक्षी आढळत आहेत. यात मुख्यत्वे श्वान आणि मांजरींचा समावेश आहे. उष्माघातामुळे दोन श्वानांचा मृत्यूही झाल्याचे फाउंडेशनने सांगितले.

मार्च महिन्यात ठाण्यात तापमानाने चाळिशी गाठली असल्याने पक्षी व प्राण्यांना उष्माघाताचा फटका बसला. त्यांना पाणी सहज उपलब्ध होत नसल्याने पिण्याच्या पाण्याच्या शोधत असताना पोटातील पाणी कमी होऊन त्यांना चक्कर येऊन ते बेशुद्ध पडतात. पक्ष्यांच्या पंखांना जखम होण्याचे प्रमाण अधिक असते.

१५ दिवसांत एसपीसीए रुग्णालयात १७ पक्षी उपचारासाठी दाखल झाले. यात पाच घार, पाच घुबड, चार ससाणे, दोन कावळे आणि एक कोकिळा यांचा समावेश आहे. कँप फाउंडेशनकडे ठाणे, मुलुंड, भांडुप, कळवा, भिवंडी येथून मांजर आणि श्वानांना उष्माघाताचा त्रास झाल्याचे फोन येत आहेत.ज्यांच्या घरात पाळीव प्राणी आहेत त्यांनी उन्हामुळे त्यांचे पूर्ण केस काढले असतील तर उलट प्राण्यांना उन्हाचा त्रास होऊ शकतो. त्यांच्या शरीराला चटके लागून त्यांना उष्माघाताचा झटका येऊ शकतो. उन्हात बाहेर पडल्याने प्राणी बेशुद्ध पडल्याच्या दोन घटना घडल्याचे फाउंडेशनचे सुशांक तोमर यांनी सांगितले. रस्त्यांत जाताना सुद्धा एखादा पक्षी आजारी दिसल्यास नागरिकांनी फाउंडेशनला कळवावे, असे आवाहन केले आहे.प्राणी, पक्ष्यांसाठी हे अवश्य कराप्राणी, पक्ष्यांसाठी मातीच्या भांड्यात स्वच्छ पाणी ठेवावे. प्राण्यांना सावलीत जागा द्यावी. त्यांची विशेष काळजी घ्यावी.गेल्या १५ मार्चपासून उन्हाचा तडाखा वाढल्यापासून पक्ष्यांचे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे.  त्यांना सलाईनद्वारे, तोंडावाटे औषधे दिले जात आहे. जखमींचे ड्रेसिंग केले जात आहे. - डॉ. सुहास राणे, एसपीसीए रुग्णालय

कँप फाउंडेशनकडे दिवसाला चार ते पाच म्हणजेच आठवड्याला ३५ फोन येत आहेत. यात पाणी न मिळाल्याने दोन श्वानांचा मृत्यू झाला आहे. उन्हाळा वाढल्याने पाळीव प्राण्यांना बाहेर काढू नये. ठिकठिकाणी त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी आणि त्यांना सावलीत बसण्यासाठी जागा द्यावी.- सुशांक तोमर, कँप फाउंडेशन.

टॅग्स :weatherहवामानthaneठाणे