शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये ठाण्यात दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 03:29 IST

आझादनगर दशरथ पाटील मैदानाजवळ राहणारा प्रेमसिंह सिसोदिया (२५) हा ७ जानेवारी रोजी ३.४५ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून घोडबंदर रोडने नाशिक ओव्हर ब्रिजवरून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरून जात होता.

ठाणे : दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये मोटारसायकलवरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी कापूरबावडी आणि वर्तकनगर पोलीस ठाण्यात अनोळखी वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. आझादनगर दशरथ पाटील मैदानाजवळ राहणारा प्रेमसिंह सिसोदिया (२५) हा ७ जानेवारी रोजी ३.४५ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून घोडबंदर रोडने नाशिक ओव्हर ब्रिजवरून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरून जात होता. त्याचवेळी त्याच्या मोटारसायकलला डाव्या बाजूने एका वाहनाने जोरदार धडक दिली. यात डोक्याला मार लागून तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल न करताच या वाहनचालकाने तिथून पलायन केले. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या प्रेमसिंह याला पोलिसांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी आझादनगर येथील प्रदीपकुमार डीडवालिया यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक अश्विनी जाधव याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. अन्य एका घटनेमध्ये यशोधननगर येथून लोकमान्यनगर बस डेपोकडे जाणाºया सार्वजनिक रस्त्यावर सिंहगर्जना को-आॅप. हाउसिंग सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एका तीसवर्षीय अज्ञात मोटारसायकलस्वाराला एका वाहनाने जोरदार धडक दिली. ही घटना ७ जानेवारी रोजी पहाटे ४.५० वा.च्या सुमारास घडली. या घटनेत या दुचाकीस्वाराच्या डोक्याला आणि डाव्या बरगडीला गंभीर मार लागला. यातच त्याचा मृत्यू झाला.ओळख पटवण्याचे कामच्पोलीस उपनिरीक्षक डी.ई. गोडे हे अधिक तपास करत आहेत. या अनोळखीची ओळख पटवण्याचे काम सुरू असून कोणालाही या तीसवर्षीय तरुणाबाबत माहिती असल्यास त्यांनी वर्तकनगर पोलिसांशी संपर्क साधावा.

टॅग्स :Accidentअपघातthaneठाणे