शहरं
Join us  
Trending Stories
1
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
2
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
3
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
4
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
5
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
6
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
7
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
8
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
9
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
11
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
12
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
13
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
14
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
15
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
16
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
17
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
18
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
19
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
20
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!

दोन दिवस पाणीकपात

By admin | Updated: November 6, 2016 04:15 IST

दिवाळी संपताच दरवर्षी १५ टक्के पाणीकपात करून जुलैपर्यंत पाणी पुरवणाऱ्या लघू पाटबंधारे विभागाने यंदा पाऊस चांगला होऊनही सात टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय

ठाणे : दिवाळी संपताच दरवर्षी १५ टक्के पाणीकपात करून जुलैपर्यंत पाणी पुरवणाऱ्या लघू पाटबंधारे विभागाने यंदा पाऊस चांगला होऊनही सात टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. हे पाणी शेतीसाठी दिले जाणार आहे. त्यासाठी दर आठवड्याला बारा तास पाणीपुरवठा बंद ठेवावा, असे त्यांनी ठाणे जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिकांना सुचवले आहे. मात्र असे पाणी बंद न ठेवता सरसकट दोन दिवस २४ तास पाणीपुवठा बंद ठेवण्याचा पर्याय पालिकाना सोयीचा असून त्यानुसार महिन्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहील. ठाणे महापालिकाने तसा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी १५ नोव्हेंबरपासून सुरू होईल. त्यानुसार ठाण्याचा पाणी पुरवठा मंगळवारी आणि कळवा, मुंब्य्राचा पाणी पुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे. गेल्यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने ठाण्यासह जिल्ह्यातील विविध भागांना पाणी कपातीच्या झळा सहन कराव्या लागल्या होत्या. काही भागांत तर चार, चार दिवस पाणी नसल्याने नागरिकांचे हाल झाले होते. कल्याण-डोंबिवलीत आठवड्यातून तीन दिवस पाणीपुरवठा बंद होता. मीरा-भाईंदर आणि उल्हासनगर पालिकेतील परिस्थिती भीषण बनली होती. उल्हासनगरमध्ये पाणी पळवू नये म्हणून जलकुंभांचे रक्षण करण्याची वेळ आली होती. यंदा तुलनेने सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने आणि जिल्ह्यातील बहुतेक सर्व धरणे १०० टक्के भरल्यानंतरही पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. लघु पाटबंधारे विभागाने त्यासाठी परिपत्रक काढले असून प्रत्येक महापालिकेने महिन्यातून चार वेळा सात टक्के पाणीकपात करावी, अशा सूचना दिल्या आहेत. ते प्रत्येक महापालिकेला पाठविण्यात आले आहे. कपात केलेले पाणी शेतीसाठी वापरले जाणार असून त्यासाठीच ही कपात लागू केल्याची माहितीही या विभागाने दिली आहे. पाणी कपातीचे नियोजन कसे करणार हे प्रत्येक पालिकेला कळवावे लागणार आहे. (प्रतिनिधी)आठवडाभरात इतरांचेही वेळापत्रकठाणे महापालिकेने पाणीकपातीचे नियोजन ठरविल्याने त्या पाठोपाठ प्रत्येक महापालिकेला येत्या आठवडाभरात आपापले कपातीचे वेळापत्रक ठरवावे लागणार आहे. त्यामुळे १५ नोव्हेंबरपासून पुन्हा ठाणे जिल्हा पाणीकपातीच्या फेऱ्यात अडकणार आहे. ठाण्याचा पुरवठा ८ नोव्हेंबरला बंद स्टेमच्या शहाड येथील अशुद्ध पाण्याच्या वाहिनीला गळती लागल्याने वाया जाणारे पाणी रोखण्यासाठी, तसेच ठाणे पालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतील जलवाहिन्यांची दुरु स्ती, पंपिंग स्टेशनमधील दुरु स्तीसाठी ठाण्याला होणारा पाणी पुरवठा येत्या मंगळवारी ८ नोव्हेंबरला सकाळी ९ ते बुधवार सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे पुढील एक-दोन दिवस कमी दाबाने पुरवठा होणार असल्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे. सक्ती दहा दिवसांनंतरसध्या प्रत्येक महापालिका मंजूर कोट्यापेक्षा पाच ते दहा टक्के जादा पाणी उचलत आहेत. तसे त्यांनी यापुढेही केले आणि जादा पाणी उचलण्याचे प्रमाण १५ टक्कयांवर गेले तर त्या पालिकांना दंड ठोठावला जाईल, असा इशारा लघू पाटबंधारेने दिला आहे. अजून पाणीकपातीची सक्ती लागू केलेली नाही. ती १५ नोव्हेंबरनंतर अस्तित्वात येईल. मात्र जादा पाणी उचलण्याच्या बदल्यात महिन्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवून पाणी जुलैपर्यंत पुरवण्याचे नियोजन केले जाणार असल्याचे आश्वासन पालिकांनी दिल्याचे सहाय्यक अभियंत्यांनी सांगितले. ठाण्यात पुन्हा मंगळवार-शुक्रवार ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला पत्र मिळाल्याने त्यांनी आढावा घेतला. महिन्यातून चार वेळा सात टक्के पाणीकपात करणे म्हणजे १२ तासांचे शटडाऊन चार वेळा घ्यावे लागणार आहे. तसे न करता ठाणेकरांचे पाण्याचे हाल होऊ नयेत यासाठी महिन्यात दोनदा २४ तासांचे शटडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे नियोजन आता सुरु करण्यात आले असून महिन्यातून दोन वेळा कळवा, मुंब्रा आणि तसेच महिन्यातून दोन वेळा ठाण्याचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. कळवा, मुंब्य्रात शुक्रवारी शटडाऊन घेतले जाणार असून ठाण्यात मंगळवारी शटडाऊन घेतले जाणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागातील सूत्रांनी दिली.