शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाचे आमिष दाखवून ठाण्यातील व्यापाऱ्याची दोन कोटींची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 23:00 IST

एका व्यापा-याला सहा कोटींचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून त्यापोटी त्याच्याकडून दोन कोटींची रक्कम घेणा-या विनोद झा आणि अमित यादव या दोघांना मध्य प्रदेश रेल्वे पोलिसांच्या मदतीने ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ ने गुरुवारी ताब्यात घेतले.

ठळक मुद्देदोघांना मध्य प्रदेशातून अटकरोकडही हस्तगतमध्य प्रदेश रेल्वे सुरक्षा दल पोलिसांच्या मदतीने केली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यातील एका व्यापा-याला सहा कोटींचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून त्यापोटी त्याच्याकडून दोन कोटींची रक्कम घेणाºया विनोद झा आणि अमित यादव या दोघांना मध्य प्रदेश रेल्वे पोलिसांच्या मदतीने ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ ने गुरुवारी ताब्यात घेतले. या दोघांनाही आणण्यासाठी ठाणे पोलिसांचे एक पथक मध्य प्रदेशात रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाण्यातील एका व्यापाºयाची दोन कोटींची फसवणूक झाल्याची तक्रार ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडे एका व्यापाºयाने १२ फेब्रुवारी रोजी केली होती. तिची पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी गांभीर्याने दखल घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्याकडे हे प्रकरण सोपविले. या व्यापाºयाला विनोद आणि अमित यांनी सहा कोटींचे कर्ज काढून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी काही कागदपत्रे आणि दोन कोटींच्या अनामत रकमेची गरज असल्याचे त्यांनी त्याला सांगितले. आपल्याला थेट सहा कोटींचे कर्ज मिळणार असल्यामुळे तसेच हे दोघेही या व्यापाºयाच्या ओळखीतील असल्यामुळे त्यांच्यावर त्याचा विश्वास बसला. दोन कोटींची अनामत त्यांच्या सांगण्यावरून व्यापाºयाने आरटीजीएस केली. ती मिळताच दोघांनीही ती घेऊन ठाण्यातून मध्य प्रदेशात पलायन केले. नंतर, या व्यापाºयाने त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाशी संपर्क साधून ही माहिती दिली. याप्रकरणी तक्रार दाखल होण्यापूर्वीच वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या पथकाने खबरी आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे विनोद आणि अमित यांचा शोध घेतला. तेव्हा ते बिहारमधील दरभंगा येथील रहिवासी असून मुंबईतून दरभंगा येथे जाणाºया पवन एक्स्प्रेसमधून ते पसार झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्याच आधारे एका हमालाकडून ओळख पटवून या दोघांचीही माहिती खंडवा रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक महेंद्र कुमार खोजा आणि रेल्वे पोलिसांना देण्यात आली. तिच्या आधारे खंडवा रेल्वेस्थानकात पवन एक्स्प्रेस थांबताच रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकांनी विनोद आणि अमित या दोघांनाही १२ फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ही दोन कोटींची रोकडही हस्तगत केली आहे. ठाण्यातून पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय सरक यांचे पथकही त्यांना घेण्यासाठी मध्य प्रदेशात रवाना झाले असून या दोघांनाही मध्य प्रदेश न्यायालयाच्या परवानगीने लवकरच ठाण्यात आणले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी