शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

भिवंडीत दोघा भावांना विवस्त्र करून केला छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 00:23 IST

अस्लम हसन रजा अन्सारी (२३) हा इसम या दोन्ही भावांना जबरदस्तीने चिंचेच्या झाडाखाली घेऊन गेला.

भिवंडी : तरणतलावात पोहून घरी जात असणाऱ्या दोघा भावांना वाटेत अडवून त्यांच्यावर परतीच्या मार्गावरील तलावातील मच्छी चोरल्याचा खोटा आरोप करून त्या दोघांना चिंचेच्या झाडाला बांधून त्यांचा अमानुष छळ केल्याची घटना तब्बल सहा महिन्यांनंतर उघड झाली आहे. भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

याबाबतचा तपशील असा की, या घटनेतील फिर्यादी (नाव गुप्त ठेवण्यात आले आहे) व त्याचा भाऊ शहरातील टावरे स्टेडियम येथील जलतरण तलावात एप्रिल २०१९ मध्ये पोहण्यासाठी गेले होते. पोहून झाल्यानंतर दिवानशाह दर्गा येथून घरी जात असताना त्याच परिसरात राहणारा अस्लम हसन रजा अन्सारी (२३) हा इसम या दोन्ही भावांना जबरदस्तीने चिंचेच्या झाडाखाली घेऊन गेला. त्यानंतर या ठिकाणी नाजीम फारुकी (३२) याने येऊन दिवानशाह दर्गा परिसरातील तलावातील मच्छी पकडण्यास मनाई आहे, असे तुम्हाला वारंवार सांगितले तरी तुम्ही मच्छी पकडता, असा आरोप केला.

या वेळी या ठिकाणी हाफिज मुसाफ अंसारी (१७) व आलीम हाही उपस्थित होता. या वेळी अस्लम, नाजीम, हाफिज व आलीम यांनी फिर्यादी व फिर्यादीच्या भावाच्या अंगावरील कपडे काढून भावाच्या गुप्तांगाशी छेडछाड केली. त्यानंतर एका प्लास्टीकच्या बाटलीतून साप आणून तो या दोघांच्या अंगावर सोडला. घडलेल्या प्रकाराचे मोबाइलवर शूटिंग करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला.मानसिक ताण वाढलाया शारीरिक छळवणुकीमुळे व त्याचा व्हीडीओ व्हायरल केल्यामुळे मानसिक ताण वाढल्याने दोन्ही भावांनी थेट भोईवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन झालेला प्रसंग पोलिसांना सांगताच भोईवाडा पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

टॅग्स :Policeपोलिस