शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी दोघा भावांना तीन वर्षे कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 05:44 IST

न्यायालयाचा निकाल : अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत शिक्षा

ठाणे : दूध आणण्यासाठी गेलेल्या दहावीतील अल्पवयीन मुलीचा भररस्त्यात विनयभंग करून तिला व तिच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या इंद्रसेन ऊर्फ बंटी रमेश ठाकरे (२४) आणि त्याचा भाऊ चेतन (२२) या दोघांना ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश जी.पी. शिरसाट यांनी दोषी ठरवून शुक्रवारी तीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच या भावांना एक वर्षाची शिक्षाही झाल्याची माहिती सरकारी वकील रेखा हिरवाळे यांनी दिली. हा प्रकार गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबाडीनाका येथे ६ डिसेंबर २०१३ रोजी घडला होता.

पीडित १६ वर्षीय मुलगी नेहमीप्रमाणे ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शाळेतून घरी आली. तिच्या आईने तिला नाक्यावरून चहा करण्यासाठी दूध आणण्यास सांगितले. ती घरातून पैसे घेऊन अंबाडीनाका येथून दूध घेऊन घरी परतत होती. त्यावेळी आरोपी त्याच परिसरात रस्त्याच्या कडेला हातामध्ये विळा घेऊन गवत कापत होते. त्यांनी तिला पाहून तिच्याजवळ गेल्यावर इंद्रसेन याने तू माझ्याशी मैत्री करते का, असे विचारले. तेव्हा तिने त्याला विरोध केल्यावर त्याने तिचा हात पकडला. तर, चेतन याने तिची ओढणी खेचून तिला खाली पाडण्याचा प्रयत्न करून विनयभंग केला. तसेच झालेला प्रकार कोणाला सांगितल्यास तुला आणि तुझ्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली. ७ डिसेंबर रोजी याप्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात विनयभंग, पॉक्सो तसेच अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला. हा खटला ठाणे न्यायालयाचे न्यायाधीश शिरसाट यांच्या न्यायालयात आल्यावर सरकारी वकील रेखा हिरवाळे यांनी सादर केलेले पुरावे व युक्तिवाद आणि सात साक्षीदारांची साक्ष ग्राह्यमानून त्या भावांना विनयभंग आणि पॉक्सो अ‍ॅक्टनुसार प्रत्येकी तीन वर्षे कारावास आणि तीन हजार रुपये दंड तसेच अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार एक वर्ष कारावास आणि एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय