शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात वाहनांच्या बॅटऱ्या चोरणा-या दुकलीला अटक: सात बॅट-या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 21:55 IST

गेल्या अनेक दिवसांपासून वागळे इस्टेट पारपत्र कार्यालयाजवळ उभ्या असलेल्या वाहनांमधून बॅट-या चोरीस जात होत्या. याप्रकरणी एका सीसीटीव्हीच्या आधारे तजुद्दीन खान या चोरटयाला वागळे इस्टेट पोलिसांनी रविवारी अटक केली.

ठळक मुद्देवागळे इस्टेट पोलिसांची कारवाईसीसीटीव्हीच्या आधारे मिळाला दुवाउभ्या वाहनांमधील बॅट-या चोरीचे वाढले होते सत्र

ठाणे: वागळे इस्टेट भागात उभ्या असलेल्या वाहनांमधील बॅट-या चोरणा-या टोळीपैकी तजुद्दीन खान (२१, रा. श्रीनगर, वागळे इस्टेट, ठाणे ) याला वागळे इस्टेट पोलिसांनी रविवारी अटक केली. त्याच्याकडून ४२ हजारांच्या सात बॅट-या हस्तगत करण्यात आल्या आहेत.वागळे इस्टेट भागातील जुने पारपत्र कार्यालयाच्या मागील रोड क्रमांक आठ येथे उभ्या असलेल्या संतोष निकम (रा. जयमहाराष्टÑनगर, वागळे इस्टेट, ठाणे) यांच्या ट्रकच्या २४ हजारांच्या दोन बॅट-या ६ डिसेंबर रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी चोरी केल्या होत्या. निकम यांच्यासह अनेकांच्या वाहनांच्या बॅट-यांची चोरी झाल्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात शोध पथकाचे उपनिरीक्षक अनिकेत पोटे यांचे पथक गस्त घालीत होते. त्यावेळी खब-यांनी दिलेल्या माहितीच्या तसेच सीसीटीव्हीच्या आधारे खानला ९ डिसेंबर रोजी अटक त्यांनी केली. गेल्या अनेक दिवसांपासून वागळे इस्टेट परिसरातील वाहनांच्या बॅट-या चोरीस जात होत्या. त्याच्या अटकेमुळे येथील वाहन चालकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. त्याने दोन गुन्ह्यांची कबूली दिली असून त्याच्याकडून आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्याचे आणखी कोण कोण साथीदार आहेत? बॅट-या विक्रीसाठी तो कोणाची मदत घेत होता? या सर्व बाबींचा तपास करण्यात येत असल्याचे पठाण यांनी सांगितले.-

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी