शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील तीन तरुणींचा विनयभंग करणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 22:31 IST

अश्लील शेरेबाजी करीत तीन महाविद्यालयीन तरुणींचा विनयभंग करुन पसार झालेल्या अमिर खान आणि मोसिन शेख या दोघांना वागळे इस्टेट पोलिसांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास अटक केली.

ठळक मुद्देअश्लील शेरेबाजीही केलीवागळे इस्टेट पोलिसांची कारवाईगेल्या आठवडाभरापासून सुरु होता शोध

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: लोकमान्यनगर येथील दोन तरुणींचा पाठलाग करीत विनयभंग करणा-या अमिर खान (२१) आणि मोसिन शेख (२१, रा. दोघेही रघुनाथनगर, वागळे इस्टेट, ठाणे) या दोघांना वागळे इस्टेट पोलिसांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.मुलूंड येथील १९ वर्षीय तरुणी ठाण्यातील तिच्या दोन मैत्रिणींसमवेत ९ जुलै २०१९ रोजी रात्री ८.३० वा. च्या सुमारास घरी जाण्यासाठी एमआयडीसी बस थांब्याजवळ उभी होती. त्यावेळी अमिर आणि त्याचे दोन साथीदार हे काळया रंगाची फिल्म लावलेल्या एका कारमधून तिथे आले. ‘गाडीत बस तुला घरी सोडतो, असे बोलून त्यांनी अश्लील शेरेबाजीही केली. त्यानंतर त्यांनी दोन ते तीन वेळा त्यांचा पाठलागही केला. याप्रकरणी त्यांनी संबंधित महाविद्यालयात तक्रार केल्यानंतर या महाविद्यालयाने वागळे इस्टेट पोलिसांशी संपर्क साधून ही माहिती दिली. याप्रकरणी १०जुलै रोजी विनयभंगाची तक्रार दाखल झाली. याची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे यांच्या पथकाने गेली सात ते आठ दिवस सापळा लावून त्या कारच्या क्रमांकाच्या आधारे खान आणि शेख या दोघांना १८ जुलै रोजी अटक केली. त्यांच्या अन्य एका साथीदाराचाही शोध घेण्यात येत असल्याचे वागळे इस्टेट पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग