लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: वागळे इस्टेट परिसरात पुन्हा दुचाकींना आगी लावण्याचे प्रकार सोमवारी पहाटेच्या सुमारास घडले. याप्रकरणी राकेश पठाण आणि सूर्यवंशी या दोघांना श्रीनगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली.वागळे इस्टेट, जुनागाव येथे राहणाºया सफाई कर्मचाºयाने त्यांची दुचाकी रोड क्रमांक २८ येथे एका दुकानासमोर उभी केली होती. त्याच ठिकाणी अन्यही दोन दुचाकी उभ्या केल्या होत्या. या दुचाकींना २४ जानेवारी रोजी रात्री १०.३० ते २५ जानेवारी रोजी पहाटे १.४० वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी आगी लावल्या होत्या. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या पथकाने राकेश पठाण याच्यासह दोघांना अटक केली. त्यांनी या दुचाकींना आगी का लावल्या? याचा तपास करण्यात येत असल्याचे श्रीनगर पोलिसांनी सांगितले.
ठाण्यातील वागळे इस्टेट भागात दुचाकी पेटविणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 00:17 IST
वागळे इस्टेट परिसरात पुन्हा दुचाकींना आगी लावण्याचे प्रकार सोमवारी पहाटेच्या सुमारास घडले. याप्रकरणी राकेश पठाण आणि सूर्यवंशी या दोघांना श्रीनगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली.
ठाण्यातील वागळे इस्टेट भागात दुचाकी पेटविणाऱ्या दोघांना अटक
ठळक मुद्दे श्रीनगर पोलिसांची कारवाई