शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बिटकॉईनद्वारे गुंतवणूकदारांना गंडवणाऱ्या दोघांना गोव्यातून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 22:22 IST

गेनबिटकॉईन कंपनीत बिटकॉईन १८ महिन्यांसाठी गुंतवणूक केल्यास त्यावर दरमहा १० टक्के परतावा देण्याचे अमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणा-या टोळीपैकी चेतन पाटील आणि अमित बिर या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे.

ठळक मुद्दे४४ लाख ५१ हजारांची फसवणूकठाणे पोलिसांची कामगिरीगुंतवणूकीमध्ये १० टक्के परतावा देण्याचे अमिष

ठाणे : गेनबिटकॉईन कंपनीत बिटकॉईनच्या गुंतवणूकीचे अमिष दाखवून गुंतवणूकदारांची ४४ लाख ५१ हजार ६०१ रुपयांची फसवणूक करणा-या चेतन पाटील (२६) आणि अमित बिर (४३) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाने मंगळवारी अटक केली. त्यांना १८ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.कल्याणच्या खडकपाडा भागातील रघुवीर कुलकर्णी यांना रवी मिश्रा आणि त्याचे साथीदार अमित भारद्वाज, अजय भारद्वाज, सुरजसिंग लगाना, रतन मुरपानी, अमित बिर आणि चेतन पाटील यांनी गेनबिटकॉईन कंपनीत बिटकॉईन १८ महिन्यांसाठी गुंतवणूक केल्यास त्यावर दरमहा १० टक्के परतावा देण्याचे अमिष दाखविले होते. याच अमिषातून त्यांना गुंतवणुकीसाठी प्रेरित केल्याने कुलकर्णी यांनी मिश्रा आणि त्याच्या साथीदारांवर विश्वास ठेवून वेळोवेळी गेनबिटकॉईन कंपनीमध्ये २२ लाख ५९ हजारांची गुंतवणूक केली. अमित भारद्वाज याने अचानक कंपनी बंद केली. त्यामुळे दरमहा दहा टक्के परतावा देणे किंवा मुद्दल रक्कम यापैकी कोणतीही रक्कम न देता फसवणूक केल्याप्रकरणी रवी मिश्रासह सात जणांविरुद्ध फसवणुकीसह चिटफंड आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अमित भारद्वाज (रा. नवी दिल्ली) याला २५ जून २०१८ रोजी पुण्याच्या येरवडा कारागृहातून ताबा घेऊन अटक केली. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणामध्ये २२ लाख ५९ हजार किंमतीचे २९.१ बिटकॉईन कुलकर्णी यांनी तर सात गुंतवणूकदारांनी २१ लाख ९२ हजार ६०१ रुपये किंमतीचे ३२.६० बिटकॉईन असे एकूण ६१.७ बिटकॉईनसाठी ४४ लाख ५१ हजार ६०१ रुपयांची गुंतवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणात पोलिसांना हुलकावणी देणारा चेतन पाटील आणि अमित बिर या दोन्ही दलालांना १४ आॅगस्ट रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास गोव्यातील पणजी येथील मॅजेस्टिक हॉटेलमधून ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन मोबाईल, एक लॅपटॉप आणि काही बँकाचे एटीएम कार्डही त्यांच्याकडून जप्त केले आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविण पवार, उपायुक्त दीपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली या टोळीतील इतरांचाही शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाfraudधोकेबाजी