शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रवी पुजारीच्या नावाने विकासकाकडून खंडणी मागणाऱ्या दोघांना कर्जत येथून अटक

By धीरज परब | Updated: October 2, 2022 20:50 IST

मीरा भाईंदरमध्ये बांधकाम व्यवसाय सह शाळा, पॅथॉलॉजी लॅब आदी व्यायवसायात असणाऱ्या दिलीप पोरवाल यांच्या डीमार्ट समोरील कार्यालयात एका चिठ्ठी द्वारे ५० लाखांची खंडणी मागण्यात आली होती. खंडणी न दिल्यास त्यांना व त्यांचा मुलगा गौरवला ठार मारण्याची धमकी त्यात देण्यात आली होती.

मीरारोड - भाईंदरमधील बड्या विकासकाला चिठ्ठी पाठवून रवी पुजारीच्या नावाने ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या आणि मुलासह जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने कर्जत जवळील कशेळे गावातून अटक केली आहे. 

मीरा भाईंदरमध्ये बांधकाम व्यवसाय सह शाळा, पॅथॉलॉजी लॅब आदी व्यायवसायात असणाऱ्या दिलीप पोरवाल यांच्या डीमार्ट समोरील कार्यालयात एका चिठ्ठी द्वारे ५० लाखांची खंडणी मागण्यात आली होती. खंडणी न दिल्यास त्यांना व त्यांचा मुलगा गौरवला ठार मारण्याची धमकी त्यात देण्यात आली होती. या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन बिल्डर पोरवाल व मुलास पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे. 

पोलीस आयुक्त सदानंद दाते व उपायुक्त विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनाखाली ३ पथके नेमली. सहायक आयुक्त अमोल मांडवे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविराज कुऱ्हाडे व राहुल राख सह त्यांच्या पथकांनी गुन्ह्याचा तपास सुरु केला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही सह विविध तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपास करून दोन आरोपींची ओळख निश्चित केली. 

गुन्हे शाखेच्या पथकाने इस्टेट एजंट मोहम्मद इक्बाल मोहम्मद अली शेख ( वय ४९ ) रा.  सलमा मंजील, चिमटपाडा, मरोळनाका, अंधेरी आणि लॉरेन्स लिओ चेट्टीयार रा.  गजानन सोसायटी, साकीनाका, अंधेरी ह्या दोघांना रायगड जिल्ह्यातून अटक केली आहे. धमकीची चिठ्ठी दिल्यावर हे तेथे लपून बसले होते. गुन्हे शाखा दोघांची कसून चौकशी करत असून अटक आरोपींनी रवी पुजारी याचे नाव वापरून धमकावल्याची शक्यता आहे. आरोपींचे कोणाशी लागेबांधे आहेत व या मागचे कारण पोलीस शोधत आहेत असे सूत्रांनी सांगितले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईPoliceपोलिस