शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सोनसाखळीसह वाहन चोरी करणाऱ्या दोघांना अटक: कळवा पोलिसांची कामगिरी

By जितेंद्र कालेकर | Updated: December 29, 2022 20:28 IST

४८ तासांमध्येच केली उकल: मोटारकार हस्तगत

ठाणे: सोनसाखळी जबरी चोरीसह वाहन चोरी करणाऱ्या वाहीद आरीफ हुसेन उर्फ प्रिंन्स (२७, रा. मनिषानगर, कळवा, ठाणे) आणि  मुस्तफा मनवर शेख (२५, रा. ठाकुर पाडा, मुंबा, ठाणे ) या दोघांना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैयालाल थोरात यांनी गुरुवारी दिली. आरोपींकडून पावणे दोन लाखांच्या मोटारकारसह सोनसाखळीही जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. 

कळवा भागातून एक महागडी मोटारकार चोरी झाल्याचा गुन्हा कळवा पोलिस ठाण्यात २२ डिसेंबर २०२२ रोजी दाखल झाला होता. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलिस निरीक्षक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गजेंद्र पाटील, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे उपनिरीक्षक किरण बघडाणे आणि दीपक घुगे आदींच्या पथकाने घटनास्थळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित आरोपीचा ठाणे शहरातील कळवा बाळकूम, कशेळी, मानकोली आणि भिंवडी परिसरातील सीसीटीव्हींचीही तपासणी केली. त्याचबरोबर तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी वाहीद आरीफ हुसेन याला या प्रकरणात अवघ्या ४८ तासांमध्ये अटक केली. त्याने या चोरीची कबूली दिली असून त्याच्याकडून चोरीतील एक लाख ७५ हजारांची वॉल्सवेगन पोलो कंपनीची मोटारकार जप्त केली आहे. सोनसाखळीची जबरी चोरी करणाराही जेरबंद-दरम्यान, कळवा बिट मार्शल ४ चे पोलिस हवालदार  सुनिल कोळेकर आणि पोलिस नाईक  निलेश थोरात कळव्यातील न्यू शिवाजीनगर मार्केटमध्ये २४ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी गस्त घालीत होते. त्याचवेळी एक व्यक्ती त्यांना  मार्केटमधील महिलेशी  झटापट करून पळून जाताना त्यांना आढळला. चौकशीत आपल्या गळयातील सोनसाखळी जबरीने चोरी करुन चोरटा पळाल्याची माहिती या महिलेने पोलिसांना दिली.

ही माहिती मिळताच या पोलिस पथकाने सिनेस्टाईल  पाठलाग करून मुस्तफा शेख  या चोरटयाला रंगेहाथ पकडले. त्याच्या अंगझडतीमध्ये एक तोळे वजनाची तुटलेली सोनसाखळी पोलिसांनी हस्तगत केली. त्यानेही या जबरी चोरीची कबूली दिली. जबरी चोरीनंतर अवघ्या तासाभरातच सोनसाखळी परत मिळाल्याने या महिलेने पोलिसांचे आभार मानले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी