शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

डान्स शो व मोठ्या इव्हेंटमधील तरुणींना वेश्या व्यवसायस लावणाऱ्या दोघांना अटक, ६ तरुणींची सुटका

By धीरज परब | Updated: July 24, 2023 21:10 IST

पोलिसांनी ६ तरुणींची सुटका केली आहे. 

मीरारोड - डान्स शो व मोठ्या इव्हेंट मधील तरुणींना आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास लावणाऱ्या दलाल महिलेस तिच्या साथीदारासह पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी ६ तरुणींची सुटका केली आहे. 

मीरा भाईंदर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरीक्षक समीर अहिराव याना माहिती मिळाली कि , नंदिनी शंकर वडारी ( ३३ ) रा . दसरा मैदान चाळ , रामायण नगर , उल्हासनगर हि महिला तिची तृतीयपंथी साथीदार पूनम उर्फ अन्नू ( ३५ ) रा . उल्हासनगर सोबत व्हॉट्सऍप द्वारे ग्राहकांना डान्स शो व इव्हेन्ट मॅनेजमेंट मधील मॉडेल तरुणींना वेश्याव्यवसाय साठी पाठवते . नंदिनी हि मुंबई , ठाणे , पुणे , लोणावळा , महाबळेश्वर, इगतपुरी , कर्जत सह गुजरात , गोवा , दमण भागात गाडीने तरुणींना ग्राहकाला पुरवते असे समजले . 

अहिरराव यांनी बोगस गिर्हाईक मार्फत नंदिनीशी संपर्क केला असता तिने २५ हजारांच्या मोबदल्यात डान्स शो मधील मॉडेल तरुणी देण्याचे नक्की केली. अहिररराव यांनी विजय निलंगे ,रामचंद्र पाटील , उमेश पाटील , केशव शिंदे , चेतनसिंह राजपूत , शीतल जाधव , सम्राट गावडे , अश्विनी वाघमारे अश्या पोलीस पथकासह भरोसा सेलच्या सहायक निरीक्षक तेजश्री शिंदे , महिला हवालदार बी . के . देशमुख यांना बोलावून वरसावे नाकाच्या फाऊंटन हॉटेल जवळ सापळा रचला.  

नंदिनी हि तिच्या गाडीतून ६ तरुणींना फाउंटन येथे घेऊन आली. बोगस गिऱ्हाईकला गाडीतील तरुणी दाखवून एकीसाठी त्याच्या कडून २५ हजार घेतले.  लागलीच पोलिसांनी धाड टाकून नंदिनी सह गाडीचा चालक राजेश उर्फ विकी रामचंद्र (३८) तेजूमल चक्की रोड , उल्हासनगर १ नागदेव ह्या दोघांना पकडले . पीडित ६ तरुणींची चौकशी करून त्यांना सुधारगृहात पाठवले आहे . काशीमीरा पोलीस ठाण्यात पिटा चा गुन्हा दाखल करत नंदिनी व राजेश ला त्यांच्या ताब्यात दिले आहे . तर  तृतीयपंथी  पूनमचा शोध सुरु आहे. नंदिनी हि ब्युटी पार्लर चालवत असून डान्स शो व स्टेज शो करताना तिची पूनम सोबत ओळख झाली होती . ४ वर्षां पासून ती हा धंदा चालवत होती . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरmira roadमीरा रोडCrime Newsगुन्हेगारी