शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

ठाण्यात वाहतूक शाखेच्या पोलिसाला मारहाण करणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 21:50 IST

चुकीच्या मार्गाने आलेल्या दुचाकीस्वाराला हटकल्याने त्यानेच वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल गिरीष अहिरराव यांना मारहाण केल्याचा प्रकार ठाणे रेल्वे स्थानक परिसरात सोमवारी घडला. याप्रकरणी महेश अलगुमीनी आणि सत्यविजय सरवणकर यांना ठाणेनगर पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देठाणे रेल्वे स्थानक परिसरातील घटनासोमवारी रात्रीची घटना चुकीच्या दिशेने येऊन केली अरेरावी

ठाणे : विरुद्ध दिशेने आल्याचा जाब विचारल्याने वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल गिरीष अहिरराव (३५) यांच्या श्रीमुखात लगावून त्यांना शिवीगाळ करणा-या महेश अलगुमीनी आणि सत्यविजय सरवणकर यांना ठाणेनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.अहिरराव हे सोमवारी रात्री ७.३० वा. च्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानकासमोरील डॉ. बाबासाहेबर आंबेडकर पुतळयाजवळ वाहतूक नियमनाचे काम करीत होते. त्यावेळी चुकीच्या दिशेने आलेल्या महेश अलगुमीनी याला त्यांनी थांबविले. त्याच्यावर कारवाई करीत असतांनाच त्याने त्याचा साथीदार सत्यविजय याच्या मदतीने मोबाईलमध्ये चित्रण करण्यास सुरुवात केली. अहिरराव यांनी तसे करण्याला आक्षेप घेतल्यानंतर महेश आणि सत्यविजय दोघांनीही त्यांच्या सरकारी कामात अडथळा आणून शिवीगाळ केली. त्यांना धक्काबुक्की करीत शर्टाची कॉलर पकडून डाव्या श्रीमुखात लगावली. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोघांनाही अटक केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक ए. जी. कुंभार हे अधिक तपास करीत आहेत.-------------------

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtraffic policeवाहतूक पोलीस