शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाखांच्या खंडणीसाठी मारहाण करणाऱ्या दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 00:34 IST

दोन लाखांच्या खंडणीसाठी बाळकूम येथील जेष्ठ नागरिकाला मारहाण करुन त्याच्या कारची जबरीने चोरी करणाºया सचिन भोईर (३६, रा. शहापूर, ठाणे) आणि गणेश घाडगे (३५, रा. ठाणे) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने मंगळवारी अटक केली आहे.

ठळक मुद्देठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाईकारचीही जबरी चोरी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: दोन लाखांच्या खंडणीसाठी बाळकूम येथील जेष्ठ नागरिकाला मारहाण करुन त्याच्या कारची जबरीने चोरी करणाºया सचिन भोईर (३६, रा. शहापूर, ठाणे) आणि गणेश घाडगे (३५, रा. ठाणे) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने मंगळवारी अटक केली आहे. त्यांना ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.शहापूर येथील रहिवासी सचिन याला बँकेकडून कर्ज घेण्यासाठी फाईल तयार करुन देण्यासाठी ठाण्याच्या ढोकाळी येथील रमेश निकम यांनी त्यांच्याकडून १९ हजार रुपये घेतले होते. परंतू, सचिनचे कर्ज मंजूर न झाल्यामुळे त्याने निकम यांच्याकडे १९ हजारांची रक्कम मागूनही त्यांनी ती परत केली नाही. त्यानंतर ३ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कापूरबावडी नाका येथील महादेव हॉटेल येथे सचिन, गणेश आणि अन्य एका अनोळखी तरुणाने संगनमत करुन निकम यांना बोलविले. तिथे त्यांच्या शर्टच्या खिशातील मोबाईल खेचून त्यांना स्पेन्सर हॉटेल येथे नेले. तिघांपैकी अनोळखीने त्यांच्या कारची चावी जबरदस्तीने घेऊन त्यांना मारहाण केली. त्यानंतर बँकींग अ‍ॅपद्वारे मोबाईलवर ४९९ चा रिचार्जही केला. निकम यांच्या घरी जाऊन त्यांची ११ लाखांची इरटीका कार गणेश जबरीने घेऊन आला. आता दोन लाख रुपये दे, नाहीतर तुला तुझी कार देणार नाही, असे त्यांना धमकावले. पैसे न दिल्याने सचिन आणि गणेश यांनी ‘आमचे पैसे तुझ्याकडे आहेत, असे धमकावून कबूल करण्यास सांगून तसा व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यानंतर दोन लाख रुपये त्यांच्याकडे असल्याचे प्रतिज्ञापत्रही कोर्ट नाका येथे करुन मारहाण करुन त्यांची कारही घेऊन गेले. याप्रकरणी ६ सप्टेंबर रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात खंडणी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलीस आयुक्त जयजित सिंग, अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक जे. डी. मुलगीकर, पोलीस नाईक प्रशांत भुरके, हवालदार संदीप भोसले, सुरेश यादव आणि योगिराज कानडे तसेच कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या पथकाने सचिनला शहापूर येथून तर गणेशला ठाण्यातून अटक केली. त्यांच्या तिसºयाही साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी