शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खंडणीतील फरारी दोन आरोपींना अटक: वर्तकनगर पोलिसांची कारवाई

By जितेंद्र कालेकर | Updated: October 20, 2019 22:38 IST

ठाण्यातील हॉटेल व्यावसायिकाकडे २५ हजारांच्या खंडणीची मागणी करीत त्याच्या दोन कर्मचाऱ्यांना मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिल्यानंतर पसार झालेल्या दोघांना वर्तकनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. गेल्या सात महिन्यांपासून ते पोलिसांना गुंगारा देत होते.

ठळक मुद्देगेल्या सात महिन्यांपासून होते पसारहॉटेल व्यवसायिकाकडे मागितली होती २५ हजारांची खंडणीदोन कर्मचाऱ्यांना मारहाण करुन दिली ठार मारण्याची धमकी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: एका हॉटेल व्यावसायिकाला २५ हजारांच्या खंडणीची मागणी करुन त्याला मारहाण करुन पसार झालेल्या अशोक कांबळे (३५) आणि सचिन घरबुडवे (३७) या दोघांना नुकतीची वागळे इस्टेट भागातून वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनाही न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.खंडणी प्रकरणातील अशोक आणि सचिन हे दोघेही आरोपी हे वागळे इस्टेट भागात फिरत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर आणि पोलीस निरीक्षक रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर आव्हाड, पोलीस नाईक सुनिल निकम, प्रदीप चौधरी आणि पोलीस हवालदार संदीप भोसले आदींच्या पथकाने या दोघांनाही १५ आॅक्टोबर रोजी अटक केली. त्यांना १७ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. या दोघांनाही १८ आॅक्टोबर रोजी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. सुप्रित भंडारी (३३, रा. कळवा, ठाणे) हे नोकरीला असलेल्या ठाण्यातील उपवन भागातील सुरसंगित बार अ‍ॅन्ड रेस्टॉरन्टच्या बाहेर २४ मार्च २०१९ रोजी बसले होते. त्यावेळी या हॉटेल मालकाने २५ हजारांची खंडणी न दिल्याच्या रागातून मंगेश सदरे याने प्रसाद शेट्टी, नरेंद्र भडांगे, अशोक कांबळे आणि सचिन आदी १५ ते १६ साथीदारांच्या मदतीने विनोद पाटील कुठे आहे अशी विचारणा केली. त्यानंतर या टोळक्याने भंडारी यांना मारहाण केली होती. त्यावेळी त्यांच्या मदतीला आलेल्या सूरज याच्याही हातावर ब्लेडने वार करुन त्याला जखमी केले होते. त्यानंतर हॉटेल बंद करा, असे बोलून हॉटेलचे गेट जबरदस्तीने ओढून ठार मारण्याची धमकी दिली. त्यावेळी मंगेश सदरे याच्यासह १२ ते १३ जणांविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात खंडणी उकळणे, हाणामारी आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी प्रसाद शेट्टी आणि नरेंद्र भडांगे या दोघांना २५ मार्च २०१९ रोजी तर मंगेश सदरे याला २४ एप्रिल २०१९ रोजी अटक झाली आहे. यातील अन्यही फरारी आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक