शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात मालमत्ता खरेदीचे सव्वादोन कोटींचे व्यवहार! दसऱ्याच्या मुहूर्तावर झाला सौदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 01:31 IST

Thane Property News : दसऱ्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील नोंदणी व मुद्रांक विभागाच्या ठिकठिकाणच्या सह दुय्यम निबंधक (रजिस्टार) कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात दोन कोटी २३ लाख ३२ हजारांचे शेत, घर,जमीन खरेदी, विक्रीचे व्यवहार रविवारी सुटीच्या दिवशी झाले.

- सुरेश लोखंडेठाणे : दसऱ्याच्या मुहूर्तावर रविवारी घरांच्या खरेदीसह शेतजमीन, फार्महाऊस खरेदी - विक्रीचे एका दिवसात तब्बल दोन कोटी २३ लाख ३२ हजार ५६५ रुपयांपेक्षा अधिक रकमेचे व्यवहार ठाणे जिल्ह्यात झाले आहेत. कोरोनाचे सावट असतानाही यंदा व्यवहार उत्तम झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. या खरेदी, विक्रीच्या व्यवहारांतून शासनाच्या महसुलात वाढ झाल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.दसऱ्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील नोंदणी व मुद्रांक विभागाच्या ठिकठिकाणच्या सह दुय्यम निबंधक (रजिस्टार) कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात दोन कोटी २३ लाख ३२ हजारांचे शेत, घर,जमीन खरेदी, विक्रीचे व्यवहार रविवारी सुटीच्या दिवशी झाले. यंदा अयोध्येत राम मंदिर उभारणीच्या मुहूर्तावर एका दिवसात जिल्ह्यात ४६ कोटींचे स्थावर मालमत्तेच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले होते.या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांतून कल्याण, डोंबिवली शहर परिसरात तब्बल ८५ लाख ८९ हजार ९७५ रुपयांचे मुद्रांक शुल्क वसूल झाले. याशिवाय या व्यवहारांच्या दस्त नोंदणीतून २२ लाख १८ हजार रुपयांची ह्यफीह्ण शासनाला प्राप्त झाली. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील कार्यालयांमध्ये ७० लाख ८८ हजार ५९० रुपये किमतीचे व्यवहार झाले आहेत. यामध्ये ५४ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क आणि या व्यवहारांच्या नोंदणी (रजिस्टेशन) फीद्वारे १५ लाख ९० हजार ८६० रुपयांचा महसूल शासनाला मिळाला आहे.ॲग्रीमेंट - लिव्ह लायसन्सची नोंदणीठाणे : जिल्ह्यातील या व्यवहारांची १२४ दस्त नोंदणी करण्यात आली आहे. तर १५ लिव्ह ॲण्ड लायसन्सची कागदपत्रे व सात ॲग्रीमेंटच्या दस्तांचा समावेश आहे. यातील सर्वाधिक व्यवहार भिवंडी परिसरात झाले आहेत. त्याखालोखाल उल्हासनगर आणि शहापूर परिसराचा समावेश आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर होणाऱ्या या मोठ्या रकमेच्या खरेदी, विक्रीची शक्यता गृहीत धरून रविवारी सुटीच्या दिवशीदेखील जिल्ह्यातील काही सह दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवली होती. या व्यवहारांच्या दस्त नोंदणी व मुद्रांक शुल्कच्या माध्यमातून महसूल जमा झाला.

टॅग्स :thaneठाणेHomeघर