शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कासवांची तस्करी करणाऱ्या परप्रांतीय तरुणाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2018 15:55 IST

कल्याण वनविभागाची मोठी कारवाई

कल्याण : कासवांची तस्करी करण्यासाठी बिहारहून कल्याणमध्ये आलेल्या एका तरुणाला कल्याण वन विभागाने काल रात्री अटक केली. कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरील एका लॉजजवळ सापळा रचून या तरुणाला अटक करण्यात आली. दिलशान अहमद असे या तरुणाचे नाव असून त्याच्याकडून ५० कासवे हस्तगत करण्यात आली. यामधील ४६ कासव जिवंत तर चार मृत असल्यची माहिती वनविभागाने दिली. बिहार राज्यातील पाटना दानापूर येथे राहणारा दिलशान अहमद ५० कासवे घेऊन काल रात्री पाटलीपुर एक्स्प्रेसने कल्याण रेल्वे स्थानक येथे उतरला. तो कल्याण रेल्वे स्थानकासमोरील महाराष्ट्र गेस्टहाऊसमध्ये थांबला होता. दिलशान कासवांची तस्करी करण्यासाठी कल्याणमध्ये आल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल -बेलापूर, तसेच आर एफ ओ एस. एस कंक यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण वनविभागचे वनपाल मुरलीधर जागकर आणि संपूर्ण टीम आणि सर्पमित्र योगेश कांबळे व वन्यजीव अभ्यासक सुहास पवार यांनी सापळा रचून काल रात्री दीडच्या सुमारास दिलशानला अटक केली त्याच्याकडून ५० ब्लॅक पौंड टर्टल प्रजातींची कासवे जप्त करण्यात आली. दिलशान कासवांची ऑनलाईन तस्करी करत होता. याबाबत वनविभागाची पुढील चौकशी सुरू असून कासवांना लवकर त्यांच्या मूळ अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.कासवांचे मांस खाल्ल्याने वाताचे आजार बरे होतात. घरात रोगराई व साथीचे आजार येत नाही, अशा प्रकारचे भ्रामक गैरसमज लोकांमध्ये आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कासवांची खरेदी केली जाते. भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ च्या परिशिष्ट एकच्या भाग दोननुसार भारतातील प्रत्येक कासव अनुसूची एकमध्ये संरक्षित केला गेला आहे. या कायद्याचे उल्लंघन करून कासव पाळणे, शिकार करणे, तस्करी करणे किंवा तसे करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास ३ ते ७ वर्षांचा कारावास आणि २५,००० रुपये दंड अशी जबर शिक्षा आहे. या शिक्षेची तरतूद असतानाही आजही सर्रासपणे कासवाची खरेदी विक्री सुरु असल्याचे दिसून येते.  

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हा