शहरं
Join us  
Trending Stories
1
कोट्यवधींची गुंतवणूक, १६ लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती; मुंबईसाठी CM फडणवीसांचा अजेंडा
2
जपानच्या अधिकाऱ्याचा फोन चीनच्या विमानतळावर चोरीला गेला; अणुऊर्जा प्रकल्पांसह अत्यंत गोपनीय माहिती लीक होण्याचा धोका...
3
परभणी-जिंतूर मार्गावर पहाटे भीषण अपघात; कीर्तनाहून परतणाऱ्या तीन वारकऱ्यांचा मृत्यू
4
डोनाल्ड ट्रम्प यांची तेल कंपन्यांसोबत बैठक, अमेरिका भारताला व्हेनेझुएलाचे तेल देण्यास तयार; पण एका अटीवर...
5
ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान
6
भयंकर प्रकार! 'द राजा साब'च्या स्क्रीनिंगदरम्यान प्रभासच्या चाहत्यांनी कागदाचे तुकडे जाळले, व्हिडीओ व्हायरल
7
बांगलादेशात नव्या युगाची नांदी! खालिदा जिया यांच्यानंतर आता सुपुत्र तारिक रहमान यांच्याकडे बीएनपीची धुरा
8
आजचे राशीभविष्य १० जानेवारी २०२६ : धनु राशीला पदोन्नतीचे योग, तर तूळ राशीने राहावे सतर्क; वाचा काय सांगते तुमचे नशीब!
9
आमच्या अस्तित्वासाठी नव्हे, राज्यातील भावी पिढीच्या भवितव्यासाठी एकत्र आलो: ठाकरे बंधू
10
वडापाव-दाल पकवानचे महागठबंधन सत्तेवर येणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी-सिंधीवर भाष्य
11
विचारसरणी सोडून काँग्रेससोबत जाणाऱ्यांवर भाजपने कारवाई करावी: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
12
कुठे, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक? मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये काय गाजतेय?
13
अजित पवारांची मिळाली साथ; अंबरनाथमध्ये शिंदेसेनेने भाजपचे ‘सत्तास्वप्न’ लावले उधळून
14
अमेरिका : मोदींनी फोन न केल्याने करार रखडला; भारत : मोदी-ट्रम्प यांच्यात ८ वेळा फोनवर संवाद
15
यंदा अर्थसंकल्प रविवारी मांडणार? अधिवेशन सुरू होणार २८ जानेवारीपासून; १३ फेब्रुवारीला संपेल
16
ईडीविरोधात तृणमूल संतप्त, खासदारांची दिल्लीत निदर्शने; ८ खासदार पोलिसांच्या घेतले ताब्यात
17
आम्ही जाणार नाही! चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी उमेदवारांच्या प्रचाराकडे फिरवली पाठ
18
सत्ताधाऱ्यांचे ‘विकासा’चे तर विरोधकांचे ‘बदल हवा’; ठाण्यात ठाकरे बंधू, भाजप-शिंदेसेनेचे बॅनर
19
राज्यात आचारसंहिता भंगाच्या १८६ तक्रारी, ८ कोटी जप्त केले; ३८ गुन्हे नोंदविण्यात आले
20
कारमध्ये १६ लाखांची रोकड; आचारसंहिता पथकाची कारवाई, पैसे कोठून आले? नवी मुंबईत कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथीयांसोबत कोपरीत साजरा झाला हळदी-कुंकू समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : सर्वांनाच सामावून घेणारा हळदी-कुंकू समारंभ करू या, तीळगूळ देऊन त्यांच्याशीही गोड बोलू या, असा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : सर्वांनाच सामावून घेणारा हळदी-कुंकू समारंभ करू या, तीळगूळ देऊन त्यांच्याशीही गोड बोलू या, असा संदेश देण्यासाठी तृतीयपंथीयांसोबत हळदी-कुंकू समारंभ शुक्रवारी साजरा करण्यात आला. समाजाने नाकारलेल्या या घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा प्रयत्न होता. कोपरी येथे हा आगळावेगळा कार्यक्रम पार पडला.

‘तीळगूळ घ्या, गोड गोड बोला’, अशा शुभेच्छा आपण एकमेकांना देत असतो. याच पद्धतीने तृतीयपंथीयांसोबत आपणच गोड का नाही बोलावे, हा या मागचा उद्देश. ‘लोकमत’च्या पत्रकार प्रज्ञा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ओपन मॅरेज करणारी भारतातील पहिली तृतीयपंथी माधुरी सरोदे-शर्मा, मुंबई विद्यापीठातून पदवीधर झालेली पहिली तृतीयपंथी श्रीदेवी, कथ्थक नृत्य करणारी तृतीयपंथी श्यामली, मेकअप आर्टिस्ट तृतीयपंथी बॉबी या त्यांच्या घरी आल्या होत्या. यावेळी कविता म्हात्रे, सुभद्रा गायकवाड, सोनाली गायकवाड, विद्या पाटील आणि रजनी पाटील, सोनाली पोकळे पवार, मंदा शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. सुरुवातीला त्यांच्यावर फुले उधळून त्यांचे औक्षण केले. समाज तुम्हाला स्वीकारतोय, तुम्ही आमच्यात सामील व्हा, हा या कार्यक्रमामागचा हेतू होता. त्यानंतर कुटुंबातील प्रत्येक सदस्याने या तृतीपंथीयांना हळदी-कुंकू लावून, त्यांना तीळगूळ, गजरा आणि वाण देऊन संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी पुरणपोळी आणि मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद घेतला. लोक तृतीयपंथीयांना भीतीपोटी किंवा दयेपोटी पैसे देतात; परंतु त्यांच्यातील माणूस पाहून त्यांना तीळगूळ देण्याच्या हेतूने हा कार्यक्रम आयोजित केले होता, असे कविता म्हात्रे म्हणाल्या.

---------------------------------

तृतीयपंथीयांच्या मंडळातर्फे हळदी-कुंकू कार्यक्रम होत असतो; परंतु सामान्य कुटुंबाने घरात बोलवून हा मान दिला, हे पहिल्यांदाच घडले आहे. तृतीयपंथीयांना एकत्र करून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण आम्हाला करायचे आहे. त्यासाठी ‘द्या टाळी’ हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. या समारंभात आम्हाला निमंत्रण देऊन जो मानसन्मान दिला त्याबाबत म्हात्रे कुटुंबाचे आभार.

-माधुरी सरोदे-शर्मा, तृतीयपंथी

ज्यावेळी मला या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले, त्यावेळी मला खूप गहिवरून आले. समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची ही पहिली पायरी आहे. आजही आम्हाला समाज दुर्लक्षित करीत आहे. आम्हाला तुमच्यात सामील करून घ्या.

-श्रीदेवी, तृतीयपंथी

--------------------

फोटो मेलवर