शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत फेरीवाल्यांमध्ये तुंबळ हाणामारी; जागेवरून पुन्हा राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 00:22 IST

आठ जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

डोंबिवली : व्यवसायासाठी रस्त्यावर बसण्यावरून फेरीवाल्यांमध्ये शहरात राडेबाजी सुरूच आहे. पूर्वेला रेल्वेस्थानक परिसरात सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वेस्थानक परिसरात १५० मीटरपर्यंत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मनाई आहे. परंतु, या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकडे केडीएमसी प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. १४ आॅक्टोबरला फेरीवाला सलाउद्दीन शेख याने दुसरा विक्रेता जाफर इंद्रिसी याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. यात इंद्रिसी गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर केडीएमसीकडून ठोस कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने फेरीवाल्यांमध्ये राडेबाजीची घटना पुन्हा घडली आहे.पूर्वेला स्थानक परिसराला लागून असलेल्या रस्त्यावर सोमवारी रात्री बसण्याच्या जागेवरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात एका फेरीवाला महिलेलाही मारहाण झाली आहे.

डोंबिवलीतील स्कायवॉक असो अथवा रेल्वे स्थानकालगतचे रस्ते, यावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायम असताना दुसरीकडे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फेरीवाल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. व्यवसायासाठी मोक्याची जागा बळकवण्यावरून हा हाणामारीचा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी १६ जणांवर गुन्हा दाखल झाला असून आठ जणांना ताब्यात घेतले आहे. उर्वरित फेरीवाल्यांना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आहेर यांनी ‘लोकमत’ला दिली.केडीएमसीचे अधिकारी आणि पथकही निष्क्रियरेल्वेस्थानक परिसराचा परिसर हा केडीएमसीच्या ‘ग’ आणि ‘फ’ प्रभाग क्षेत्राच्या अंतर्गत येतो. परंतु, ‘ग’ चे प्रभाग अधिकारी चंद्रकांत जगताप, ‘फ’ चे प्रभाग अधिकारी दीपक शिंदे आणि त्यांच्या पथकांचे फेरीवाला अतिक्रमणाकडे दुर्लक्ष झाले आहे.स्कायवॉकवर आणि स्थानक लगतचे रस्ते फेरीवाल्यांना त्यांनी आदंण दिल्याची चर्चा आहे. तसेच यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचेही उल्लंघन होत आहे.फेरीवाला अतिक्रमणविरोधी पथकाचे उपायुक्त सुनील जोशी यांच्याशी संपर्क साधला असता फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी झाल्यावर ठोस कारवाई करता येईल, असा दावा त्यांनी केला. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि दिवाळी यामुळे या धोरणाची अंमलबजावणी करता आली नाही.

टॅग्स :Policeपोलिस