ठाणे / मुंब्रा : रशीद कम्पाउंड, कौसा भागात राहणाऱ्या ८ वर्षीय शिरीन शेख या मुलीला एका अनोळखीने जाळण्याचा प्रयत्न केला. या मुलीवर नेरूळच्या एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून, हल्लेखोराचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.कलीमउल्लीसा शेख (४०) या महिलेची शिरीन मुलगी असून, ती ७ फेब्रुवारी २०१७ रोजी घराच्या शेजारील मैदानात खेळण्यासाठी गेली होती. त्या वेळी तिला ठार मारण्याच्या हेतूने हल्लेखोराने तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. यात ती सुमारे ४० टक्के भाजली. तिच्यावर नेरूळच्या डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. हा गुन्हा मुंब्रा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक डी.ए. चव्हाण हे या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
अल्पवयीन मुलीवर रॉकेल ओतून पेटवण्याचा प्रयत्न
By admin | Updated: March 20, 2017 07:11 IST