शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये मिळाला ठाण्यातून चोरीस गेलेला १५ लाखांचा ट्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 22:51 IST

ठाण्यातून चोरीस गेलेल्या एका ट्रकला औरंगाबाद जिल्हयातील वैजापूर येथून ताब्यात घेण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहे. ट्रकला असलेल्या जीपीएसमुळे ही चोरी पकडली गेली. मात्र, पोलीस मागावर असल्याचे समजल्यामुळे चोरटयाने मात्र पोबारा केला.

ठळक मुद्देकापूरबावडी पोलिसांची कामगिरीचोरटयाची हुलकावणी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यातील माजीवडा भागातील मुंबई नाशिक मार्गावरुन चोरीस गेलेला १५ लाखांचा ट्रक औरंगाबाद जिल्हयातील वैजापूर येथील एका ढाब्यावरुन आणण्यात कापूरबावडी पोलिसांना यश आले आहे. या ट्रकच्या चोरटयाने मात्र पोलिसांना हुलकावणी दिली आहे. त्याचा अद्यापही शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.या ट्रकचे चालक बंधू भाटकर यांनी १७ आॅक्टोबर २०२० रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मुंबई -नाशिक राष्ट्रीय मार्गावरील माजीवडा उड्डाणपूलाच्याजवळ हा ट्रक उभा केला होता. १८ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ते ट्रकजवळ गेले. तेंव्हा तिथून ट्रक चोरीस गेल्याचे आढळले. याप्रकरणी भाटकर यांनी तात्काळ कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय पाटील यांच्या पथकाने या चोरीचा तपास सुरु केला. तेंव्हा ट्रकला असलेल्या जीपीएस यंत्रणेच्या आधारे तो औरंगाबाद जिल्हयातील वैजापूरपासून जवळच असलेल्या एका ढाब्याच्या ठिकाणी उभा असल्याचे आढळले. ठाणे पोलिसांनी वैजापूर पोलिसांच्या मदतीने हा ट्रक १९ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतला. मात्र, ट्रक चोरी करणाऱ्याने तिथून पलायन केले होते. हा ट्रक आता मुळ मालकाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. ट्रकची चोरी करणाºयाचा मात्र अजूनही शोध घेण्यात येत असल्याचे कापूरबावडी पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी