शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

दहा थर लावणाऱ्या पथकाला २१ लाख; मनसेची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 03:57 IST

गेल्या वर्षी १० थरांना ११ लाखांचे पारितोषिक ठेवणाऱया मनसेने यंदा आपल्या बक्षिसाची रक्कम चांगली वाढवली आहे.

ठाणे : गेल्या वर्षी १० थरांना ११ लाखांचे पारितोषिक ठेवणाऱया मनसेने यंदा आपल्या बक्षिसाची रक्कम चांगली वाढवली आहे. मनसे आयोजित यंदाच्या दहीहंडीत १० थरांचे मनोरे रचणाºया मंडळाला तब्बल २१ लाख रुपये रोख देण्याचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे यंदाची दहीहंडी कोण फोडणार? १० थर लागणार का, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.दहीहंडी उत्सवाचे पडघम वाजू लागले आहेत. गोविंदांचा सराव जोर धरू लागला आहे. दुसरीकडे आयोजकही तयारीला लागले आहेत. मोठ्या रकमांची दहीहंडी उत्सव आयोजित करणाºया ठाण्यातील काही आयोजकांनी अद्याप आपल्या पारितोषिकांच्या रकमा जाहीर केल्या नसल्या, तरी मनसेने गुरुवारी आपल्या पारितोषिकाची रक्कम सोशल मीडियावर जाहीर केली. आपल्या दहीहंडी उत्सवात १० थर लावणाºया पथकाला मनसे ठाणे शहर २१ लाख रुपये रोख, तर नऊ थर लावणाºया पथकाला ११ लाख रुपये रोख देणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. गेल्या वर्षी मनसे ठाणे शहर आयोजित दहीहंडी उत्सवात १० थर लावणाºया पथकाला ११ लाख रुपये रोख पारितोषिक जाहीर केले होते. यावेळी बोरिवलीच्या शिवसाई गोविंदा पथकापाठोपाठ जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाने नऊ थरांची सलामी दिली होती. परंतु, शिवसाई गोविंदा पथकाने पहिल्याच प्रयत्नात नऊ थरांची सलामी देऊन विश्वविक्रमाची बरोबरी केली होती, तर जयजवान गोविंदा पथकाचा दोनदा १० थर लावण्याचा प्रयत्न फसला होता. तिसºयांदा मात्र त्यांनी नऊ थर लावून सलामी दिली होती. त्यामुळे दोघांना ११ लाखांचे बक्षीस विभागून देण्यात आले होते. याचवेळी बोरिवलीच्या बाळ मित्र मंडळाने साडेआठ थर लावले होते. यंदा ते नऊ थर लावणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले. गेली दोन वर्षे शिवसाई आणि जयजवान या गोविंदा पथकांनी मनसेच्या दहीहंडी उत्सवात नऊ थर रचले होते. यंदा या उत्सवाचे तिसरे वर्ष आहे. त्यामुळे १० थरांची दहीहंडी फोडून २१ लाखांचे पारितोषिक कोण पटकावणार, याची चर्चा रंगली आहे.कलेला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व पारितोषिके हे रोख रकमेच्या स्वरूपात देण्यात येणार आहे.- अविनाश जाधव,जिल्हाध्यक्ष, ठाणे-पालघर

टॅग्स :MNSमनसेthaneठाणे