शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

ठाण्यात स्मृतीदिनानिमित्त शहीद पोलिसांना मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 23:55 IST

ठाण्यात पोलीस शहीद दिनानिमित्त बुधवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह मुख्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी देशभरातील २६४ शहीद पोलिसांना मानवंदना देऊन श्रद्धांजली वाहिली. शहीदांना मानवंदना दिल्यानंतर पालकमंत्र्यांनी शहीद कुटूंबीयांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

ठळक मुद्दे पालकमंत्र्यांसह पोलीस आयुक्तांनी वाहिली श्रद्धांजली देशभरातील २६४ हुतात्म्यांचा समावेश पालकमंत्र्यांनी साधला शहीद कुटूंबीयांशी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : भारतीय जवानांच्या अतुलनीय शौर्यापासून इतरांना प्रेरणा मिळावी, कर्तव्याची आणि राष्ट्रनिष्ठेची जाणीव व्हावी, यासाठी २१ आॅक्टोबर १९५९ पासून हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून देशभर पाळला जातो. ठाण्यात यानिमित्त बुधवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह मुख्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी देशभरातील शहीद पोलिसांना मानवंदना देऊन श्रद्धांजली वाहिली.लडाख येथील भारताच्या सीमेवर बर्फाच्छादित अशा हॉटस्प्रिंग याठिकाणी पोलीस जवान २१ आॅक्टोबर १९५९ रोजी गस्त घालीत होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या चिनी सैनिकांनी त्यांच्यावर भ्याड हल्ला केला. या हल्ल्याला जवानांनी जशास तसे उत्तर दिले आणि अखेरच्या क्षणांपर्यंत झुंज दिली. या हल्ल्यात १० जवान शहीद झाले. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. त्या पार्श्वभूमीवर दरवर्षी हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. बुधवारी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाजवळील स्व. निर्मलादेवी चिंतामण दिघे उद्यानातील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहून पालकमंत्री शिंदे, पोलीस आयुक्त फणसळकर यांनी सकाळी ८ वाजता श्रद्धांजली वाहिली.  महाराष्ट्रातील १४ शहीद हुतात्म्यांसह देशभरात शहीद झालेल्या २६४ हुताम्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सहपोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, अपर पोलीस आयुक्त संजय येनपुरे, उपायुक्त प्रशांत मोहिते, बाळासाहेब पाटील, दीपक देवराज यांच्यासह शहीद पोलीस हवालदार भालचंद्र कर्डिले, शहीद पोलीस नाईक तुकाराम कदम, शहीद पोलीस हवालदार रमेश जगताप आणि शहीद पोलीस नाईक बाळू गांगुर्डे यांचे कुटुंबीय तसेच पोलीस कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.* यावेळी पालकमंत्री शिंदे यांनी राज्य शासनाच्या वतीने शोक संदेशाचे वाचन केले. शहीदांना मानवंदना दिल्यानंतर पालकमंत्र्यांनी शहीद कुटूंबीयांची भेट घेतली.* यावेळी प्रथमच ठाण्यात शहीद झालेल्या चार पोलिसांची नावे स्मृतीस्तंभाच्या बाजूला कोरण्यात आली होती.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसGovernmentसरकार