शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

त्या आदिवासी तरुणाला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयामुळे मिळाले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 17:18 IST

ठाणे: क्रिकेट खेळताना पोटावर पडल्याने अंतर्गत रक्तस्राव होऊन प्रकृती गंभीर झालेल्या पालघर जिल्ह्यातील सुनील तुंबाड (२०) या तरुणाला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉ. निशिकांत रोकडे व सहकारी डॉक्टरांनी अवघड शस्त्रक्रिया करुन जीवदान दिले.गोरगरीबांचे रुग्णालय अशी ओळख असलेल्या ठाण्यातील शासकीय रुग्णालयात ठाणे, पालघर आणि आजूबाजूच्या जिल्हयातील गरीब रुग्ण उपचाराकरिता येतात. रविवारी, ...

ठळक मुद्देक्रि केट खेळताना पोटावर पडल्याने अंतर्गत रक्तस्त्राव; त्याच्या पोटातून काढले दीड लीटर रक्तस्वादुपिंडावर ठाण्याच्या शासकीय रु ग्णालयातील यशस्वी शस्त्रक्रिया

ठाणे: क्रिकेट खेळताना पोटावर पडल्याने अंतर्गत रक्तस्राव होऊन प्रकृती गंभीर झालेल्या पालघर जिल्ह्यातील सुनील तुंबाड (२०) या तरुणाला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉ. निशिकांत रोकडे व सहकारी डॉक्टरांनी अवघड शस्त्रक्रिया करुन जीवदान दिले.गोरगरीबांचे रुग्णालय अशी ओळख असलेल्या ठाण्यातील शासकीय रुग्णालयात ठाणे, पालघर आणि आजूबाजूच्या जिल्हयातील गरीब रुग्ण उपचाराकरिता येतात. रविवारी, १४ जानेवारी रोजी पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात राहणा-या सुनील या आदिवासी तरुणाला गंभीर अवस्थेत उपचाराकरिता दाखल केले. सुनील क्रिकेट खेळताना, खड्डयात पडल्याने त्याच्या पोटाला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या स्वादुपिंडाला मार लागल्याने त्याच्या पोटात अंतर्गत रक्तस्राव सुरू झाला होता. सुनीलच्या प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बी. सी. केम्पीपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. निशीकांत रोकडे यांनी त्याच्यावर तातडीने उपचार सुरू केले. तपासण्या झाल्यावर सोमवार, १५ जानेवारी रोजी पहाटे सुनीलवर शस्त्रक्रिया केली. तब्बल अडीच तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर सुनीलच्या पोटातून दीड लीटर रक्त तसेच स्वादूपिंडातून रक्तस्त्राव होणारा काही भाग यशस्वीरित्या काढण्यात आला. सुनीलला तीन बाटल्या रक्त देण्यात आले. ही यशस्वी शस्त्रक्रिया करताना डॉ. रोकडे यांना भूलतज्ज्ञ डॉ.रु पाली यादव,परिचारिका कृपा घोडविंदे, मदतनीस मिलिंद दौंडे व जावेद शेख यांचे सहकार्य लाभले.‘‘ सुनील हा शेतकरी कुटुंबातील एकुलता एक मुलगा खेळताना,पडल्यामुळे त्याच्या स्वादूपिंडातून रक्तस्त्राव होत होता. ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वी झाला असून सध्या तो धोक्याच्या बाहेर आहे. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. लवकरच तो घरी परतेल.’’- डॉ. निशिकांत रोकडे 

टॅग्स :thaneठाणेHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल