शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी गावांचा कायापालट होणार, रस्त्यांसाठी ७१ कोटींचा निधी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 14:46 IST

राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या पुढाकारातून भिवंडी लोकसभा मतदारसंघात रस्त्यांसाठी ७१ कोटींचा निधी मंजूर

डोंबिवली : केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या माध्यमातून भिवंडी लोकसभा मतदारसंघातील आदिवासी गावांचा कायापालट होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या पाठपुराव्याने आदिवासी भागातील रस्त्यांसाठी ७१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, लवकरच कामांच्या निविदा काढल्या जाणार आहेत. या कामांमुळे आदिवासी बांधवांचा दररोजचा प्रवास सुकर होईल असे त्यांनी सोमवारी जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे. पाटील प्रतिनिधीत्व करीत असलेल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात ठाणे ग्रामीण जिल्ह्याचा समावेश होतो. या गावांमध्ये आदिवासी समाजाची संख्या मोठी आहे. या गावांचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी पाटील यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. केंद्र सरकारच्या पंतप्रधान आदी आदर्श गाव योजनेमध्ये ठाणे जिल्ह्यातील १२१ गावांचा समावेश करण्यात आला. त्यानुसार या गावांच्या विकासासाठी आराखडे तयार करण्यात येत आहेत. गावातील ग्रामस्थांच्या गरजांचा आदर्श गाव आराखड्यात समावेश करण्यासाठी तीन वेळा ग्रामसेवक व सरपंचस्तरावरील बैठका घेण्यात आल्या. त्यावेळी अस्तित्वातील रस्त्यांच्या दुरुस्तीची गरज स्पष्ट झाली होती. बहुसंख्य गावातील सरपंचांकडून रस्त्यांच्या कामांना सर्वाधिक प्राधान्य देण्याची विनंती करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला होता. त्यानुसार राज्य सरकारने आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत लेखाशीर्ष ३०५४ अन्वये भिवंडी लोकसभा मतदारसंघातील विविध रस्त्यांसाठी ७१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. भिवंडी, मुरबाड, शहापूर, वाडा तालुक्यातील रस्त्यांच्या कामांचा समावेश असलेला शासन निर्णय राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागाने १६ फेब्रुवारी रोजी जारी केला. त्यामुळे या गावांचा विकास दृष्टीपथात येणार आहे.

या गावातील रस्त्यांबरोबरच १२१ गावांमध्ये पिण्याचे पाणी, पायाभूत सुविधा, शैक्षणिक सुविधा, उत्पन्न वाढविण्यासाठी उपाययोजना आदींना प्राधान्य दिले जात आहे. आदिवासी गावांना जोडण्यासाठी ओढ्यांवर साकव, पाड्यांमध्ये सौरउर्जेवर आधारित लघु नळपाणी पुरवठा योजना आदी कामांवरही लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. आदिवासी महिलांचे बचतगट स्थापन करून महिलांच्या सक्षमीकरण, पिंजऱ्याच्या माध्यमातून मत्स्यशेती आदींवर भर देण्यात येत आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात ७१ कोटी रुपयांची कामे मंजूर केल्याबद्दल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांचे आभार मानले आहेत. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सर्व लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेऊन मंत्री विजयकुमार गावित यांनी रस्त्यांसाठी निधी दिला, याबद्दल पाटील यांनी समाधान व्यक्त केले. 

टॅग्स :bhiwandiभिवंडीKapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलTrible Development Schemeआदिवासी विकास योजना