शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदर पालिकेवर आज आदिवासींचा बि-हाडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 01:40 IST

काशिमीरा येथील जनतानगरमध्ये राहणाऱ्या आदिवासींना पालिकेने बीएसयूपी योजनेंतर्गत पक्की घरे देण्याच्या आश्वासनावर त्यांची घरे पाच वर्षांपूर्वी तोडली. त्यांचे तात्पुरते पुनर्वसन पत्र्यांच्या शेडमध्ये केले.

भार्इंदर : काशिमीरा येथील जनतानगरमध्ये राहणाऱ्या आदिवासींना पालिकेने बीएसयूपी योजनेंतर्गत पक्की घरे देण्याच्या आश्वासनावर त्यांची घरे पाच वर्षांपूर्वी तोडली. त्यांचे तात्पुरते पुनर्वसन पत्र्यांच्या शेडमध्ये केले. पालिकेने त्यांना पक्की घरे न दिल्याने अद्याप बेघर ठेवल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून आदिवासींचा उद्या बिºहाडी मोर्चा पालिका मुख्यालयावर धडकणार आहे.पालिकेने जनतानगरमधील झोपडपट्टीधारकांना बीएसयूपी योजनेत सामावून घेत त्यांना सुमारे ३६० चौरस फुटांची पक्की घरे देण्यासाठी २००९ पासून योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत गेल्या वर्षी एकच आठ मजली इमारत बांधली असून त्यात १७९ लाभार्थ्यांना प्राधान्यक्रमाने सामावून घेण्यात आले आहे.या योजनेच्या सुरुवातीला अनेक लाभार्थ्यांसह तेथील सुमारे ७० आदिवासी कुटुंबांनी योजनेलाच विरोध दर्शवला होता. परिणामी, योजना रेंगाळू लागली. अखेर, योजनेला हळूहळू प्रतिसाद मिळवण्यात पालिकेला यश आल्यानंतर पाच वर्षांपूर्वी त्या आदिवासी कुटुंबांनीही योजनेला प्रतिसाद दिला. त्यामुळे पालिकेने त्यांची घरे तोडून पत्र्यांच्या सुमारे १०० चौरस फुटांच्या घरात तात्पुरते पुनर्वसन केले. त्यावेळी त्यांना इतर लाभार्थ्यांप्रमाणेच दरमहा भाडे दिले जाईल, असे आश्वासन पालिकेने दिले होते. परंतु, पाच वर्षांत पालिकेने या आदिवासी कुटुंबांना एक छदामही दिला नसल्याचा दावा संघटनेने केला आहे. त्यांना त्यांच्या घराच्याच ठिकाणी पक्की घरे बांधून देण्याचेही पालिकेकडून सांगण्यात आले होते. त्यालाही वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या.पालिका लाभार्थी आदिवासींना घराचा करारनामा करून देणार होती. तो करारनामाही अद्याप प्रतीक्षेत असून गेल्या सात ते आठ वर्षांत पालिकेने केवळ एकच इमारत बांधली. त्यातही त्या आदिवासी कुटुंबांना सामावून घेण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली होती. त्यालाही पालिकेने अमान्य केल्याने त्यांची बोळवण केल्याचा आरोप केला जात आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर