शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
2
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
3
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
4
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
5
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
7
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
8
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
9
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
10
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
11
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
12
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
13
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
14
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
15
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव
17
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
18
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
19
‘मित्रांनो, क्षमा करा; मुंबईत आता आणखी लोकांचे स्वागत नाही’
20
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार

वृक्ष लागवडीची चळवळ हरित क्रांती घडवेल - मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 12:43 AM

भारताच्या इतिहासातील नवीन विक्रम करणारा आजचा दिवस आहे. वृक्षलागवडीचा कार्यक्रम आता केवळ सरकारचा राहिलेला नसून तो लोकचळवळीचा भाग बनला आहे.

कल्याण : भारताच्या इतिहासातील नवीन विक्रम करणारा आजचा दिवस आहे. वृक्षलागवडीचा कार्यक्रम आता केवळ सरकारचा राहिलेला नसून तो लोकचळवळीचा भाग बनला आहे. भावी पिढीसमोर जल, जंगल, जमीन वाचवण्याचे आव्हान उभे ठाकले असताना वृक्षलागवडीची लोकचळवळ महाराष्ट्रात हरित क्रांती घडवेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.१३ कोटी वृक्षारोपण महामोहिमेच्या राज्यस्तरीय शुभारंभाचा कार्यक्रम रविवारी कल्याणजवळील वरप येथील राधास्वामी सत्संग आश्रमामागील वनविभागाच्या जागेवर पार पडला. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री एकनाथ शिंदे, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, वनराज्यमंत्री राजे अंबरिश आत्राम, सपना मुनगंटीवार, खासदार कपिल पाटील, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार संजय केळकर, नरेंद्र पवार, निरंजन डावखरे, ज्योती कलानी, जि. प. अध्यक्ष मंजूषा जाधव, सद्गुरू जग्गी वासुदेव, सिनेदिग्दर्शक सुभाष घई, आचार्य बाळकृष्ण, मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, राज्यात ५० कोटी वृक्षलागवडीचा संकल्पना २०१६ मध्ये मांडण्यात आली. सुरुवातीला इतरांना हे दिवास्वप्न वाटत होते. २०१६ ला तीन कोटी वृक्षांची लागवड करण्यात आली. गेल्या वर्षी पाच कोटींपेक्षा अधिक वृक्ष लागले. यंदा १३ कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे; पण त्याहून अधिक वृक्षांची लागवड केली जाईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.वृक्षलागवडीची संकल्पना आता सरकारी राहिलेली नाही, तर ती लोकचळवळ बनली आहे आणि जेव्हा जनतेचे आंदोलन सुरू होते, तेव्हा त्याला कोणीही थांबवू शकत नाही. या चळवळीतूनच हरित महाराष्ट्राचे पाहिलेले स्वप्न पूर्ण होणार असल्याचे फडणवीस म्हणाले. केवळ वृक्ष लावून आपण थांबणार नाहीत. दुसऱ्या टप्प्यात जिओ टॅनिंग करण्यात येणार असून प्रामाणिकपणे प्रत्येक रोपाच्या वाढीची नोंद होणार आहे. आता वाढदिवशी आणि मंगलप्रसंगी रोपे लावण्याची प्रथा जनतेमध्ये रुजत आहे, ही चांगल्या बदलाची सुरुवात आहे, असेही फडणवीस म्हणाले.नागरिकच होणार आॅडिटरनुसते खड्डे केले आणि झाडे लावली, असे आता होणार नाही. तुम्ही प्रत्यक्ष व्हिडीओ क्लिप्सद्वारे प्रत्येक कालावधीतील रोपांची वाढ पाहू शकता. एक प्रकारे नागरिकच या मोहिमेचे आॅडिटर असतील, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांतील प्रयत्नांमुळे महाराष्ट्र देशात वनसंपदा वाढवण्यात अग्रेसर ठरत असून २७३ स्कवेअर किलोमीटर वनक्षेत्र वाढले आहे. ५० टक्के मॅन्ग्रोव्हची वाढ झाली असून चार हजार ४६५ स्क्वेअर किमी बांबू क्षेत्र वाढत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.मुनगंटीवार यांचे कौतुकआजपर्यंतच्या सर्व वनमंत्र्यांमध्ये सुधीरभाऊ यांना पहिला क्रमांक दिला पाहिजे. लावलेली झाडे मोठी होताना पाहणे, हे मुनगंटीवार यांच्यासाठी मोठे समाधान असेल, अशा शब्दांत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले. सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी आपल्या भाषणात मुनगंटीवार यांचा उल्लेख ग्रीन वॉरिअर असा केला. यावेळी सुभाष घई आणि आचार्य बाळकृष्ण यांनीदेखील मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस