शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

पडघा गट सेना राखणार? उमेदवारांमध्ये होणार काँटे की टक्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 6:15 AM

भिवंडी तालुक्यातील पडघा - कुरूंद जिल्हा परिषद गटात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय (धमनिरपेक्ष) महायुतीच्या उमेदवार रूचिता पाटील व भाजपा, श्रमजीवी संघटना आरपीआय आघाडीच्या श्रेया गायकर यांच्यात काँटे की टक्कर होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअनगाव: भिवंडी तालुक्यातील पडघा - कुरूंद जिल्हा परिषद गटात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय (धमनिरपेक्ष) महायुतीच्या उमेदवार रूचिता पाटील व भाजपा, श्रमजीवी संघटना आरपीआय आघाडीच्या श्रेया गायकर यांच्यात काँटे की टक्कर होणार आहे. २० वर्ष हा गट शिवसेनेच्या ताब्यात असून सेना तो गड राखणार का नाही याची चर्चा सुरू आहे.पूर्वीचा पडघा - बोरिवली जि.प. गट आता पडघा- कुरूंद गट नव्याने झाला आहे. या गटामधून तत्कालीन जि.प. सदस्य व शिवसेनेचे विद्यमान आमदार शांताराम मोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख, प्रकाश पाटील, माजी सरपंच गंगूबाई शेलार हे विजयी झाले आहेत. त्यामुळे हा गट शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्यातून भाजपा विजयश्री खेचून आणण्यासाठी सर्व नितीचा वापर करत आहे. आमदार, जिल्हाप्रमुख यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. यामुळे येथील लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.पडघा- कुरूंद गटात पडघा, कुरूंद, भोकरी, कुकसे, सापे, खाडवल, राहूर -देवली या सात ग्रामपंचायत व त्यामधील गावपाड्यांचा समावेश आहे. हा गट आघाडीने भाजपाला तर महायुतीने शिवसेनेला सोडला आहे. पडघा पंचायत समिती गण हा युतीने मनसेला सोडला आहे. या गटात शिवसेनेसह श्रमजीवी संघटनेची ताकद आहे. श्रमजीवीची मते ही निर्णायक ठरणार आहेत. भिवंडीतील सदस्य अगामी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ठरवणार असल्याने सर्वच पक्षाच्या नेत्यांनी या भागाकडे लक्ष दिले आहे. साततत्याने प्रचारसभा घेत मतदारांशी संपर्क साधत आहेत.मंत्र्यांच्या उपस्थितीने प्रचारामध्ये रंगतआदिवासी विकासमत्री विष्णू सवरा यांनी दाभाड, अंबाडी, गणेशपुरी, मोहडूल येथे तर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाभाड, कवाड, शेलार, पडघा, कोन, काल्हेर, अंबाडी गणात प्रचार केला. तर खासदार कपिल पाटील यांनी मोटारसायकलवरून प्रचारात सहभागी झाले होते. तर आमदार रूपेश म्हात्रे, शांताराम मोरे, महेश चौघुले यांनी सभा घेतल्या. दोन दिवसांपासून मंत्री प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.अपक्षांच्या ‘कपबशी’ निशाणीने मतदार संभ्रमातलोकमत न्यूज नेटवर्कमुरबाड : कपबशी आणि गोटीराम पवार हे विधानसभा निवडणुकीच्या काळात मुरबाड तालुक्यातील एक समीकरणच झाले होते. मात्र, आता कुडवली गटात जिल्हा परिषदेचे उमेदवार असलेले सुभाष गोटीराम पवार हे राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. तर, दुसरीकडे त्यांचे प्रतिस्पर्धी सुभाष हरिश्चंद्र पवार यांनी ‘कपबशी’ हीच निशाणी घेतल्याने राष्टÑवादीचे मतदार या एकाच नावामुळे संभ्रमात सापडले आहेत. ही निशाणी तसेच एकच नाव असलेल्या उमेदवारामुळे राष्ट्रवादीचे मतदान घटू शकते. तसेच अपक्ष उमेदवार कुडवली गटात आपले खाते उघडतात की काय, असे वातावरण आहे.विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे बंडखोर आ. गोटीराम पवार यांनी कपबशी निशाणी घेऊन आ. किसन कथोरे यांना जोरदार लढत दिली. पवार समर्थकांनी तेव्हा त्यांना दिलेल्या पाठिंब्यामुळे थोड्याशा फरकाने गोटीराम पवार यांचा पराभव झाला. मात्र, गोटीराम पवार यांनी त्या वेळी घेतलेली कपबशी निशाणी ही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचावी, म्हणून तेव्हा घराघरांत कपबशीवाटप केली होती. त्यामुळे कपबशी म्हणजे गोटीराम पवार आणि गोटीराम पवार म्हणजे राष्टÑवादी असे समीकरण आहे. या निवडणुकीत गोटीराम पवार यांचे सुपुत्र सुभाष पवार हे निवडणूक लढवत आहेत. याच नावाचा एक अपक्ष उमेदवारही रिंगणात असून त्याचे चिन्हही ‘कपबशी’ हेच आहे. या सगळ्यामुळे कपबशी निशाणी असलेला उमेदवार म्हणजे सुभाष पवार असा संभ्रम मतदारांमध्ये असून याचा परिणाम मतदानावर होतो का, हे १३ डिसेंबरला कळेलच.मुरबाड तालुक्यातील मतदार हे सुज्ञ आहेत. ते निशाणी पाहून मतदान करणार नाहीत, तर उमेदवार पाहून मतदान करतील.- सुभाष गोटीराम पवार, उमेदवार, राष्टÑवादी-शिवसेना, कुडवली गटमागील निवडणुकीत माजी आ. गोटीराम पवार यांनी ‘कपबशी’ या निशाणीवर आमदारकीची निवडणूक लढवली होती. त्यांना प्रचंड मतदान झाले होते. अपक्ष म्हणून लढताना मी देखील हेच चिन्ह घेतले आहे.- सुभाष हरिश्चंद्र पवार, अपक्ष उमेदवार, कुडवली गट

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाthaneठाणे