शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
3
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
4
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
5
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
6
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
7
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
8
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
9
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
10
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
11
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
12
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
13
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
14
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
15
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
16
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
17
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
18
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
19
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!

महापौर, आमदारांमुळे ताटकळले परिवहनमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:13 IST

कल्याण आरटीओ कार्यालय भूमिपूजन : कार्यक्रमाकडे शिवसेना, भाजप कार्यकर्त्यांची पाठ

कल्याण : राजकीय किंवा सरकारी कार्यक्रम असल्यास अनेकदा मंत्र्यांना उशीर झाल्यामुळे अनेकांना ताटकळत राहण्याची वेळ येते. उंबर्डे येथील कल्याणच्या आरटीओ कार्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमात मंगळवारी नेमके उलटे झाले. परिवहनमंत्री दिवाकर रावते या कार्यक्रमाला ११ वाजता वेळेत पोहचले; मात्र कल्याणचे आमदार नरेंद्र पवार आणि महापौर विनीता राणे तासभर उशिराने पोहचल्यामुळे रावते यांना प्रतीक्षा करावी लागली. दरम्यान, या कार्यक्रमाकडे भाजप, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्यामुळे गर्दी नव्हती. अखेर येथे पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या कार्यालयात कामानिमित्त आलेल्या नागरिकांनीच प्रेक्षकांची भूमिका बजावली.

कोकण वसाहतीनजीक असलेले कार्यालय आरटीओसाठी अपुरे पडत आहे. त्यामुळे उंबर्डे येथील जागेत नवे कार्यालय उभारण्यात येणार आहे. या कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन परिवहनमंत्री रावते यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला केवळ महापौर राणे उपस्थित होत्या. शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक जयवंत भोईर यांच्यासह अन्य कोणत्याही पदाधिकाऱ्याला कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते. शिवसेनेचा मंत्री येणार असल्यास कार्यकर्ते तेथे एकच गर्दी करतात. मात्र, रावते येणार असूनही शिवसैनिकांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती. भाजप कार्यकर्तेही आले नव्हते; केवळ भाजपचे आमदार पवार यांनी उपस्थिती लावली. तेही एक तास उशिरा पोहोचले.

पवार यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांनी भूमीपूजनाचा कार्यक्रम जळवून आणल्याचा उल्लेख रावते यांनी भाषणात केला. एकदा मुख्यमंत्र्यांनी कल्याणच्या आमदाराकडे रावते यांची लक्ष नाही अशी विचारणा रावते यांच्याकडे केली होती. त्यावेळी रावते यांनी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे अंगुलीनिर्देश करीत. निधी देण्याची जबाबदारी अर्थ मंत्र्याकडे आहे असे स्पष्ट केले होते. हे रावते यांनी यावेळी आवर्जून सांगितले. एकीकडे शिवसैनिकांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरविली असताना रावते यांनी त्यांच्या भाषणातून कल्याण हा भगव्याचा बालेकिल्ला आहे. हे सांगत असताना त्यांनी भाजप आमदार पवार यांच्याकडे नजर रोखली. त्यानंतर शिवसेना-भाजपची युती आहे, असा निर्वाळाही दिला. कार्यक्रमाला ठाणे रिजन टॅक्सी रिक्षा चालक मालक महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर उपस्थित होते. त्यांच्याकडे पाहत रावते यांनी सांगितले की, कल्याणमधून रिक्षाचालकांविरोधात प्रवाशांच्या खूप तक्रारी आहेत. मात्र आपल्याच्या माणसांविरोधात असलेल्या तक्रारी आपण समजून घेत त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. यावेळी रावते यांचा रोख पेणकर यांच्याकडे होता. पेणकर यांनी यावर केवळ हसणे पसंत केले.

रावते यांनी स्मार्ट सिटीचा उल्लेख मेगासिटी असा केला. तेव्हा सर्वांच्याच भुवया उंचावल्या. राज्यात शिवसेना व भाजपची सत्ता असली तरी पाच वर्षांत हे पक्ष समरस झालेले नाहीत. त्यामुळे रावते यांना मुख्यमत्र्यांच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाबाबत फारसे कुतूहल नसल्याचेच या वक्तव्यातून सुचवायचे आहे का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.इमारतीसाठी १३ कोटी ६३ लाखांचा निधी मंजूरकल्याण आरटीओचे कार्यालय गुरुदेव हॉटेलजवळील इमारत कार्यरत होते. ते जुने झाल्यानंतर त्याचे स्थलांतर बिर्ला कॉलेजनजीकच्या कोकण वसाहतीजवळ २००० रोजी करण्यात आले. तेथे पत्र्याच्या शेडमध्ये सुरू करण्यात आले. हे कार्यालयही अपुरे पडत आहे. त्यामुळे उंबर्डे-वाडेघर येथे ८,२२० चौरस मीटरच्या जागेत नव्याने कार्यालय उभारले जाणार आहे. त्याचे भूमिपूजन रावते यांच्या हस्ते पार पडले. नव्या कार्यालय इमारतीसाठी १३ कोटी ६३ लाखांचा निधी मंजूर झाले आहेत. परिवहन आयुक्तांनी नव्या इमारत बांधकामासाठी अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे.